आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरगुती भांडणातून पत्नीला ठार मारून रेल्वेखाली उडी घेत पतीने केली आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर - घरगुती भांडणातून धारदार शस्त्राने गळ्यावर, पोटावर, अंगावर वार करून पत्नीचा घरात खून केला. नंतर रात्री दीड वाजेच्या सुमारास घरापासून ५०० मीटर अंतरावरील रेल्वे रुळांवर जाऊन पॅसेंजर गाडीसमोर उडी मारुन पतीने आत्महत्या केली. ही घटना बदनापूर येथे रविवारी रात्री घडली. भाऊसाहेब भोसले (४६), कुशीवर्ता भोसले (३५) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. 


भाऊसाहेब भोसले व पत्नी कुशीवर्ता हे ४६ वर्षांपासून दुधना नदीच्या काठावर घर बांधून राहत होते. त्यांना मुलगा नितीन व मुलगी निकिता आहे. निकिता सासरी दुधडला राहते. तर मुलगा शेंद्रा एमआयडीसीत एका कंपनीत काम करतो. भाऊसाहेब रिक्षाचालक होता. रविवारी रात्री भाऊसाहेब व पत्नी कुशीवर्ता यांच्यात वाद झाला. यात भाऊसाहेबने धारदार शस्त्राने पत्नीच्या पोट व मानेवर वार केले. यात कुशीवर्ता जागीच मृत झाली. नंतर भाऊसाहेबने मुलगी निकिताला फोनवर पत्नीचा खून केल्याचे सांगितले. निकिताने नितीनला फोन करून पप्पा आईला मारहाण करीत आहेत, तू घरी जा, असे सांगितले. नितीनने वडिलाला फोन केला. मात्र फोन न उचलल्याने तो हताश झाला. मात्र रात्री १२ च्या दरम्यान त्याला वडिलांचा फोन आला व तुझ्या आईचा खून केल्याचे भाऊसाहेबने सांगितले. त्त्यामुळे नितीन बदनापूरला पोहोचला. आई मृत अवस्थेत पडलेली दिसली. घरात भाऊसाहेब नव्हता. त्याने वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडला नाही. त्यामुळे नितीनने पोलिसांत जाऊन तक्रार दिली. 


सकाळी सापडला भाऊसाहेबचा मृतदेह 
सकाळी वडिलांचाही मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, जमादार शेख इब्राहिम यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. 

बातम्या आणखी आहेत...