आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ठेवले करवाचौथचे ब्रत, त्यानेच दिला भयंकर मृत्यू, आरोपीने 4 लहान मुलांचाही केला नाही विचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अबोहर (पंजाब) - कौटुंबिक वादातून एका पतीने शनिवारी लोखंडी रॉडने पत्नीच्या डोक्यावर प्रहार करून तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार, पंजपीर नगरमधील रहिवासी अमनदीप कौर (35) यांच्या आई कुलवंतने तक्रार दाखल केली आहे की, त्यांच्या मुलीचा विवाह 13 वर्षांपूर्वी मंदर सिंहसेाबत झाला होता. दारूचे व्यसन लागल्याने मंदर त्यांच्या मुलीला अनेक दिवसांपासून छळत होता. मुलीने करवाचौथची तयारी केली होती. परंतु तिला माहिती नव्हते की, ज्याच्या दीर्घायुष्यासाठी ती व्रत ठेवत आहे, तोच हत्या करणार आहे.

 

पहिली पत्नीही दारूच्या व्यसनामुळे सोडून गेली...
मृत विवाहितेची आई म्हणाली की, दारूच्या व्यसनामुळे 14 वर्षांपूर्वी त्यांची पहिली पत्नीही सोडून गेलेली आहे. कायदेशीररीत्या जेव्हा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाला तेव्हा त्यांनी आपल्या मुलीचे लग्न 13 वर्षांपूर्वी मंदर सिंहसोबत लावले. अमनदीपशी लग्नानंतर त्यांना दोन 2 मुले आणि एका मुलगी झाली. त्याला पहिल्या लग्नापासून एक मुलगा होता. मागच्या काही वर्षांपासून मंदर दारू पिऊन नेहमी बायकोशी भांडण करून मारहाण करायचा. 

 

वाद एवढा विकोपाला गेला की, त्याने केली हत्या
घरात सुरू असलेल्या या वादामुळे दोन्ही बाजूंच्या अनेकदा बैठका झाल्या. परंतु नेहमी माफी मागून तो मुलीला घेऊन जायचा. शनिवारी दोघांमध्ये भांडण झाले. त्याने अमनदीपवर लोखंडी रॉडने जोरदार प्रहार करून तिला जखमी केले. मंदरच्या मुलांनी त्यांना याची माहिती दिली, तेव्हा आसपासच्या लोकांच्या मदतीने अमनदीपला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे पाहून मोठ्या रुग्णालयात रेफर केले. परंतु उपचारादरम्यानच तिची प्राणज्योत मालवली. रविवारी सकाळी शहर पोलिसांनी घटनेची चौकशी केली आणि आरोपी मंदर सिंहविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...