आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका संशयामुळे उद्ध्वस्त झाले कुटुंबः 11 वर्षांची चिमुरडी म्हणाली- पप्पा आईला मारत होते, ती ओरडत होती, मी खूपदा दार वाजवले, पण त्यांनी उघडलेच नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाली - अवैध संबंधांच्या संशयामुळे पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात काठी मारून-मारून तिची हत्या केली. पत्नीला मारल्यानंतर आरोपी स्वत:हून बलौंगी पोलिस स्टेशनला पोहोचला. म्हणाला- मी माझ्या पत्नीचा खून करून आलो आहे. यावर पोलिसांनी आरोपीला लगेच ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोपी कुरिअर कंपनीत काम करत होता.

 

आरोपी पत्नीच्या डोक्यात तोपर्यंत वार करत होता, जोपर्यंत ती मेली नाही

गोरखलाल याला आपली पत्नी अंजू कुमारीचे एकाशी अवैध संबंध असल्याचा संशय होता. गुरुवारी दुपारी गोरखलालचा अंजू कुमारीशी वाद झाला. त्याने आपल्या पत्नीसह स्वत:ला एका रूममध्ये बंद केले. एक बांबूच्या काठीने त्याने पत्नीच्या डोक्यावर प्रहार करायला सुरुवात केली. आरोपी आपल्या पत्नीच्या डोक्यात तोपर्यंत प्रहार करत राहिला, जोपर्यंत ती मेली नाही. मृत महिलेचा सर्वात मोठा मुलगा नितीन म्हणाला की, वडिलांना त्याच्या आईवर खूप दिवसांपासून संशय होता. अनेकदा त्यांनी आईशी या मुद्द्यावरून भांडणही केले होते. नितीन म्हणाला की, तो आणि त्याच्या आणखी तीन भावंडांनी अनेकदा वडिलांची समजूत काढली की, अशी कोणतीही गोष्ट नाहीये. तरीही त्याचे वडील ऐकायला तयार नव्हते. नेहमी आईशी भांडण करायचे. आरोपी गोरखलालने सांगितले की, त्याच्या पत्नीचे बाहेर अवैध संबंध होते. त्याने अनेकदा आपल्या पत्नीची समजूत काढली होती, परंतु ती ऐकली नाही.

 

मुलगी दार ठोठावत होती, बाप काठीने वार करत होता
मृत अंजूची 11 वर्षीय मुलगी कशिशही त्या वेळी घरीच होती, जेव्हा तिच्या आईची हत्या झाली. कशिशने सांगितले- आईने कपडे धुतले होते. एवढ्यात पप्पांनी आईशी भांडण सुरू केले. आई त्यांना म्हणाली की, मी छतावर जाऊन कपडे वाळत घालून येते. जेव्हा ती छतावर गेली, तेव्हा पप्पांनी आतून रूमची कडी लावून घेतली. ती जेव्हा छतावर पोहोचली तेव्हा तिला आईची किंकाळी ऐकू आली. यानंतर जेव्हा ती पळून खाली गेली, तेव्हा पाहिले की, रूम आतून बंद होती. ती सारखी दार ठोठावत होती. परंतु वडिलांनी दार उघडले नाही. यानंतर ती पळून शेजाऱ्यांना बोलवायला गेली. जोपर्यंत ती परत आली तोपर्यंत वडील दार उघडून निघून गेले होते. आणि आई रक्ताने माखलेली जमिनीवर पडलेली होती.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या प्रकरणाचे आणखी Photos... 

 

 

बातम्या आणखी आहेत...