आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेजाऱ्याने भरले कान, नवऱ्याने केली बायकोची निर्घृण हत्या, वडील म्हणाले- मुलीला त्याच्या अफेअर माहीती होते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- शेजाऱ्याच्या बोलण्यात येऊन नवऱ्याने बायकोची गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली आहे. मृत महिलेचे नाव सीमा(25) आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी नवऱ्याला अटक केले आहे. सीमाच्या कुटंबात सासू सुषमा, दीर चंदन , नवरा अमन आणि त्यांची 8 वर्षांची मुलगी शीतल आहेत. अमन ट्यूशन चालवतो.

 

सीमाचे वडील अवधेश कुमार यांनी सांगितले की, सीमाने 9 वर्षांपूर्वी आमच्या मनाविरुद्ध अमनसोबत लग्न केले होते. अमनची आई आणि भाऊ हे सीमा आणि अमनला त्रास द्यायचे. या त्रासाला कंटाळून अमन-सीमा वेगळे राहू लागले. एका महिन्यापासून ते दोघे वेगळ्या घरात राहायला आले होते. त्यावेळी तेथील अली नावाच्या युवकाने अमनला त्याचे आणि सीमाचे अफेअर असल्याचे सांगितले. त्यामुळे अमनने सीमाची गळा दाबून हत्या केली.

 

सीमा तिच्या आईला सगळ सांगायची-सीमाचे वडिल
सीमाच्या वडिलांनी सांगितले की, अमनचे एका मुलीसोबत अफेअर होते. तो रोज तासन् तास तिच्याशी बोलायचा. ही गोष्ट सीमाला आवडत नव्हती त्यामुळे दोघात रोज भांडणे व्हायची. त्यामुळेच अमनने तिची गळा दाबून हत्या केली.

 

बातम्या आणखी आहेत...