आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा खून करून रात्रभर बसून राहिला मृतदेहाजवळ, सकाळी मुलीला घेऊन गेला फिरायला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नवी दिल्ली : एका प्रेम विवाहाचा दुःखद अंत झाला. तरुणाने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर 24 तास मृतदेह घरातच पडून होता. या दरम्यान 2 वर्षांच्या मुलीला आईची आठवण आल्यामुळे आरोपी तिला बाहेर फिरायला घेऊन गेला. आरोपीने शवाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला परंतु तसे काही करू शकला नाही. स्वतःची चूक लक्षात आल्यानंतर आरोपी स्वतः शनिवारी रात्री उशिरा मुलीला घेऊन कमला मार्केट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. तेथे त्याने संपूर्ण घटना सांगितली. पोलिसांनी घटनास्थळावरून शव पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवले. मृत महिलेचे नाव रेशमा असून वय 22 वर्ष आहे.


2 वर्षाच्या मुलीने आईविषयी विचारल्यानंतर तरुणाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा केला मान्य
आरोपी कामिल आंबेडकर कॉलेजमध्ये शिपाई आहे. वर्ष 2015 मध्ये त्याने रेशमासोबत प्रेम विवाह केला होता. दोघेही कमला मार्केटमध्ये राहत होते. कामिलला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. यामुळे या दोघांमध्ये नेहमी वादही व्हायचे. शुक्रवारी रात्री त्या दोघांचे भांडण झाले. काहीवेळाने सर्वकाही शांत झाले परंतु पत्नी आणि मुलगी झोपल्यानंतर आरोपीने पत्नीचा गळा दाबून खून केला. पत्नीजवळ बसून रात्र घालवली. सकाळ झाल्यानंतर मुलीला आईची आठवण आली. त्यानंतर तो तिला घेऊन फिरायला गेला. दुपारी तीन वाजता कमला मार्केट पोलीस स्टेशनजवळही गेला परंतु गुन्हा कबुल करण्याचे धाडस झाले नाही. रात्री 2.45 वाजता तो मुलीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पत्नीचा खून केल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...