आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा खून करून पतीने घेतले विष

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड : चारित्र्यावर संशय घेत पत्नीवर कुऱ्हाडीने वार करुन खून केल्यानंतर पतीनेही विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घाटसावळी तांडा येथे गुरुवारी (दि.१२) रात्री दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, गवळणबाई अर्जुन मिटकर (४०, रा.घाटसावळी तांडा, ता.बीड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना दोन मुले आणि एक विवाहित मुलगी आहे. पती अर्जुन मिटकर हा पत्नी गवळणबाईच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातूनच गुरुवारी रात्री त्यांच्यात भांडण झाले. अर्जुनने चारित्र्यावर संशय घेत गवळणबाईच्या मानेसह कपाळावर कुऱ्हाडीने वार केले. हे वार वर्मी लागल्याने गवळणबाई जागीच ठार झाल्या. माहिती मिळताच पिंपळनेर ठाण्याचे सपोनि. शरद भुतेकर यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा रात्री १२ वाजेच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाला. पंचनामा करुन गवळणबाईचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला. या प्रकरणी मृताचा मुलगा विकास मिटकर याच्या फिर्यादीवरुन आरोपी अर्जुन मिटकरविरुध्द पिंपळनेर ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे सपोनि. भुतेकर यांनी सांगितले.

अन् प्रकार उघडकीस
पत्नीच्या खुनानंतर पश्चात्तापाच्या भावनेतून अर्जुननेही विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार काही वेळाने परिसरातील नागरिकांना कळला.
 

बातम्या आणखी आहेत...