आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 हिडन कॅमेरे लावून पती करत होता पत्नीची जासूसी, पत्नीला कळाले तर बॅटने फोडले त्याचे डोके 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक : कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये असे काही घडले जे ऐकून सर्वचजण खूप हैराण आहेत. TimesofIndia च्या बातमीनुसार, एकला व्यक्तीने आपल्या घरात 22 हिडन कॅमेरे, एक प्रायव्हेट डिटेक्टिव आणि एक स्वायवेयर सेलफोन ठेवला होता. जेणेकरून तो आपल्या पत्नीवर नजर ठेऊ शकेल. तो त्याच्या पत्नीवर खूप संशय घ्यायचा. तो पत्नीच्या प्रत्येक कॉल आणि मॅसेजची माहिती ठेवायचा. जेव्हा पत्नीला याबद्दल कळाले तेव्हा तिने रागात पतीचे बॅटने डोके फोडले. दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. 

 

पत्नीने सांगितले की, ती पतीच्या अशा व्यवहारानंतर त्याच्यासोबत राहू इच्छित नाही. तसेच पतीचे म्हणणे आहे की, पत्नीने सुंद चेहऱ्याला बिघडवले आहे म्हणू त्याला तिच्यासोबत राहायचे नाही. दोघांची पहिली भेट 2007 मध्ये झाली होती. तो लग्नासाठी मुलगी पाहायला गेला होता. पण त्याला मुलीची धाकटी बहीण आवडली होती. पण ती तेव्हा शिकत होती. लग्नासाठी तेव्हा नकार दिला गेला. पण दोघांमध्ये बातचीत सुरु झाली होती. 2010 मध्ये त्यांचे लग्न करून दिले गेले. दोघांमध्ये 11 वर्षांचे अंतर होते.  

 

सुरुवातीचे दोन वर्षे सर्वकाही चांगले होते. त्यांना एक मुलगादेखील झाला. पण काही वर्षांनंतरच त्याला पत्नीवर संशय येऊ लागला. त्याने त्याचा जॉब सोडला आणि पत्नीवर नजर ठेवायला सुरुवात केली. त्याने घराच्या प्रत्येक कोपऱ्यात छोटे-छोटे कॅमेरे लावले. त्याने पत्नीला एक फोन गिफ्ट केला ज्यामध्ये एक स्वायवेयर लावलेले होते. ज्यामुळे तो पत्नीची जासूसी आरारामात करू शकत होता. 

 

हे प्रकरण तेव्हा घडले जेव्हा त्याने पत्नीच्या फोनमधून फोटो काढून एका व्यक्तीबद्दल विचारले खरे तर तो पत्नीचा पुतण्या होता. त्यांनतर पत्नीला कळाले की, पती तिच्यावर नजर ठेवत आहे. तेव्हा पत्नीने पतीच्या डोक्यावर बॅट मारली. ज्यामाउळें त्याचे डोके फुटले. जखम ठीक झाल्यावर कौन्सेलरकडे गेले. पण त्यांनंतरही त्यांच्या आयुष्यात काहीच बदल झाले नाही. आता दोघांनाही घटस्फोट हवा आहे.

बातम्या आणखी आहेत...