आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानोएडा - येथे राहणाऱ्या एका विवाहित तरुणीला तिच्या मोबाईलवर अचानक अनोळखी लोकांचे कॉल सुरू झाले. वारंवार येणाऱ्या कॉलवर लोक तिच्याशी अतिशय गलिच्छ भाषेत संवाद साधत होते. कॉल करणारा प्रत्येक जण तिला शरीरसुखाची मागणी करत होता. महिलेने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली तेव्हा तिला यामागे आपला पतीच असल्याचे कळाले. गेल्या 10 महिन्यांपासून वेगळा राहणाऱ्या तिच्या पतीनेच तरुणीचे न्यूड फोटो पॉर्न साइटवर अपलोड केले होते. या फोटोंसह त्याने आपल्या पत्नीचा कॉल गर्ल असा उल्लेख करून त्याखाली तिचा पर्सनल मोबाईल नंबर सुद्धा दिला होता.
यावरून होता संतप्त
आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली. पोलिसांनी कारण विचारले तेव्हा आपण पत्नीच्या सोशल मीडिया अकाउंट्सची हेरगिरी करत होतो असे पतीने म्हटले आहे. फेसबूक, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर त्याची पत्नी आपल्या मित्र-मैत्रिणींसह फोटो अपलोड करायची. गेल्या 10 महिन्यांपासून तो पत्नीपासून वेगळा होऊन राहत होता. एकटी असतानाही ती इतकी खुश कशी असू शकते याचाच त्याला राग होता. मित्रांपैकी एखाद्यासोबत तिचे अफेअर असावे असा त्याला संशय होता. काही दिवसांपूर्वीच पतीने तिला आपल्या मित्रांसोबत फिरताना सोशल मीडियावर पाहिले होते. त्याचा राग काढण्यासाठी आरोपीने तिचे न्यूड फोटो एस्कॉर्ट साइटवर अपलोड केले.
2011 मध्ये झाला होता प्रेम विवाह
> पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, एका विवाहित तरुणीने आपल्याला विविद नंबर्सवरून अश्लील कॉल येत असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यापैकी काहींनी पॉर्न साइट आणि कॉल गर्ल वेबसाइटचे दाखले दिले होते. पोलिसांनी त्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या फोटोंची माहिती काढली. तेव्हा ते फोटो नेमके कुठल्या ठिकाणावरून आणि कुणाच्या गॅजेटवरून अपलोड करण्यात आल्या याची माहिती मिळाली. त्याच माहितीच्या आधारे पोलिसांनी तिच्या विभक्त राहणाऱ्या पतीला अटक केली.
> आरोपीला पोलिसांनी अटक केली तेव्हा सुरुवातीला त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. मात्र, कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपला गुन्हा मान्य केला. त्याने सांगितल्याप्रमाणे, 2011 मध्ये त्याचा आणि पीडित महिलेचा प्रेम विवाह झाला होता. दोघांना एक मुलगी देखील आहे. हे दोघेही मूळचे ओडिशातील रहिवासी आहेत. आरोपी पतीने आयआयएमसी येथून शिक्षण घेतले. तसेच सध्या नोएडा सेक्टर-3 येथील एका कंपननीत अॅसोसिएट कंसल्टन्ट पदावर कार्यरत आहे. तर त्याची पत्नी एक बीपीओमध्ये काम करते.
यामुळे घेतला वेगळे राहण्याचा निर्णय
आरोपी पती आणि त्याची पत्नी यांना विवाहातून एक मुलगी सुद्धा आहे. परंतु, कुटुंबियांमुळे दोघांमध्ये वेळोवेळी वाद वाढत गेले आणि त्यांनी एकमेकांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या 10 महिन्यांपासून एकमेकांपासून दूर राहत असले तरी अद्याप त्यांनी घटस्फोट घेतला नाही. त्यांची मुलगी आईकडे राहते. तरीही पती आपल्याला घर खर्चासाठी पैसे देत नाही अशी तक्रार तिने पोलिसांत दाखल केली होती. कुटुंबियांच्या मध्यस्थीने तिने तक्रार मागे घेतली. परंतु, पतीच्या मनात तिच्यावरील राग गेला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.