आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ध्या रात्री गाढ झोपेत होती पत्नी, पतीने रॉकेल ओतून लावली आग; 80% जळाली प्रेग्नंट महिला, गर्भातच दगावले बाळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजसमंद ( राजस्थान) - 3 महिन्यांपासून घरभाडे थकले आणि दूधवाल्याचे पैसेही बाकीच आहेत, असे पत्नी पतीला बोलल्याने त्याने चिडून प्रेग्नंट पत्नीला गाढ झोपेत असताना आग लावली. 80% जळालेल्या महिलेला उदयपूरच्या एमबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जळाल्यानंतर महिलेची प्रसूती झाली. त्यात मृत मुलगी जन्माला आली. ही घटना राजसमंद जिल्ह्यातील केळवा परिसरातील आहे. सोमवारी पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटनेनंतर तो फरार झालेला आहे. मजिस्ट्रेटनी आगीत होरपळलेल्या महिलेच्या जबाबावरून हॉस्पिटल प्रशासनाला बाळाच्या मृत्यूचे कारण असणारी रिपोर्ट मागितली आहे.


पति-पत्नीत यामुळे झाला वाद
- एएसआय सुंदरलाल म्हणाले की, रामूदेवी (24) हिच्या अंगावर शनिवारी रात्री तिचा पती देवीलालने केरोसीन शिंपडून आग लावली.

- ती 80% भाजली. सूत्रांनुसार, शनिवारी रात्री पती-पत्नीमध्ये 3 महिन्यांपासून थकलेले घरभाडे आणि दूधवाल्याचे पैसे देण्यावरून वाद झाला.

- यानंतर आरोपी देवीलाल रात्री 1 वाजता दारूच्या नशेत घरात आला आणि केरोसीनचा डबा रामूदेवीच्या अंगावर ओतून तिला आग लावली. तेव्हा ती गाढ झोपेत होती.

- जिवंत जळत असताना तिने आरडाओरड केली तेव्हा शेजारी राहणारे तिचे वडील वजेराम यांच्यासह आसपासचे लोक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग विझवून महिलेला आरके हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे तिची प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांनी तिला उदयपूरला रेफर केले. ती प्रेग्नेंट होती. रविवारी रात्री तिने मृत मुलीला जन्म दिला.   

 

 

बातम्या आणखी आहेत...