आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेस्तरॉमधून काम करून परतत होती महिला, लपून बसलेल्या पतीने पेट्रोल फेकून लावली आग, पत्नी करत राहिली विनवण्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दतिया - शनिवारी रात्री 10.13 वाजता एका रेस्तरॉमधून काम करून घरी परतणाऱ्या महिलेवर पतीने पेट्रोल फेकून आग लावली. महिलेचा आरडा ओरडा ऐकून रेस्तरॉचे मॅनेजर आणि स्टाफने गोनीने आग विझवली. तोपर्यंत महिला 40 टक्के भाजली होती. रेस्तरॉच्या कर्मचाऱ्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेले. आरोपी पती फरार असून त्याच्या विरोघात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

रिक्षाची वाट पाहत होती महिला, तेवढ्यात पतीने केला हल्ला 
पोलिसांनी सांगितले की, सेंवढा चुंगी येथील रजनी (22) चा दारुडा पती रवी साहू नेहमी वाद आणि मारहाण करत होता. रोज रोजच्या वाद आणि मारहाणीला कंटाळून रजनी पतीपासून वेगळी राहू लागली. उदरनिर्वाहासाठी तिने राजघाट तिराहा येथील चाणक्य रेस्तरॉमध्ये काम सुरू केले. रोजच्या वेळेनुसार रजनी शनिवारी रात्री 10.13 वाजता काम संपवून घरी जाण्यासाठी निघाली आणि रस्त्यावर रिक्षाची वाट पाहत होती. त्याचवेळी त्याठिकाणी लपलेल्या तिच्या पतीने तिला शिव्या द्यायला सुरुवात केली. 


पती मारहाण करेल या भितीने रजनी पळत रेस्तरॉकडे गेली. ते पाहून रवीने तिच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि आणि आग लावली. पेट घेताच रजनी रेस्तरॉच्या पायऱ्यांवर पडली आणि जोरात ओरडू लागले. ते ऐकूण रेस्तरॉचा मॅनेजर मनोज शर्मा बोरा पळत आला आणि बऱ्याच प्रयत्नांनंतर त्याने रजनीच्या शरिराला लागलेली आग विझवली. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल कऱण्यात आले. पोलिसांनी पती आणि एका अज्ञाताच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...