आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसात नोकरी लागताच पतीने केले दुसरे लग्न, 1 वर्षाच्या मुलीसोबत सासरी गेलेल्या पहिल्या पत्नीला दिले हाकलून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भागलपुर (बिहार) - प्रेमामध्ये 15 वर्षांपूर्वी झाले लग्न आणि नंतर एक मुलगी झाल्यानंतर नोकरी लागताच मुलाने पत्नीला माहेरी पाठवले. त्यानंतर मुलाने आपल्या पत्नीला अंधारात ठेवत दुसरे लग्न केले. 2 वर्षांनंतर पहिली पत्नी आपला हक्क मागण्यासाठी पतीच्या घरी गेल्यानंतर मुलाच्या घरच्यांनी तिचा स्वीकार करण्यास नकार दिला.


महिला व्यथा सांगत राहिली परंतु घरच्यांनी तिचे काही एक ऐकले नाही...
हे घटना मधुसूदनपूर गावातील आहे. गुरुवारी गावातील काही लोक हे प्रकरण सोडवण्यासाठी सासरवाडीच्या लोकांकडे चर्चेसाठी गेले. परंतु सासरच्या लोकांनी घराचा दरवाजाही उघडला नाही. त्यानंतर गावातील लोकांनी पोलिसांना बोलावले आणि त्यानंतर तपस करून पीडितेला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले.


असे आहे प्रकरण
आपल्या पतीच्या दुसऱ्या लग्नाविषयी समजल्यानंतर पीडिता सासरी गेली परंतु सासरच्या लोकांनी तिला घरातून हाकलून दिले. तेव्हा गावातील लोकांनी तिला आपल्या घरात शरण दिले. महिलेने पोलिसांना सांगितले की, आता तिला माहेरचे लोकही घरात घेण्यास तयार नाहीत आणि आता तिच्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही. पीडित महिलेने आयजी, डीआयजी, एसएसपी, मधुसूदनपूर ठाण्यासाठी महिला आयोगात अर्ज देऊन न्यायाची मागणी केली आहे. या अर्जामध्ये पत्नीने बिहार पोलिसमध्ये असलेल्या आपल्या पतीवर दुसरे लग्न करण्याचा आणि आपल्याला तसेच एक वर्षाच्या मुलीला धोका दिल्याचा आरोप लावला आहे.


महिला म्हणाली - 3 वर्ष सासरी राहिले, मुलगी जन्माला येताच त्रास देणे सुरु झाले
पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की 31 ऑक्टोबर 2003 मध्ये तिने विपिनसोबत बूढ़ानाथ मंदिरात हिंदु रितीरिवाजाने लग्न केले होते. लग्नानंतर तीन वर्ष ती सासरवाडीत राहत होती. या काळात तिने एका मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर सासरवाडीच्या लोकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. याच काळात पती विपीनला बिहार पोलिसात नोकरी लागली. नोकरी लागताच पतीचीही वागणूक बदलली. त्याने पत्नी आणि मुलीला माहेरी पाठवले आणि दुसरे लग्न केले.

बातम्या आणखी आहेत...