आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीची ही मागणी पूर्ण न केल्यामुळे पत्नीला दिला भयानक मृत्यू, खूनाला आत्महत्या दाखण्यासाठी लटवकले फासावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


भटिंडा (पंजाब) : पंजाबमधील भटिंडा येथे एका महिलेचा हुंड्यामुळे बळी गेला आहे. आरोपीने पत्नीची हत्या केली आणि आत्महत्या दाखविण्यासाठी  मृतदेहाला फासावर लटकवले. लग्नात फर्निचर न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून आरोपीने पत्नीचा खून केला आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत हुंडाबळीची तक्रार दाखल करताच पोलिसांनी पती, सासू आणि ननंद विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळारून आरोपी पतीला अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेत आहे. दीपिका (वय 22 वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. 


पतीने दीपिकाने गळफास घेतल्याचे फोन करून सांगितले

मृत महिलेचा भाऊ राहूलने सांगितले की, सौरवने बुधवारी संध्याकाळी 4 वाजता फोन करून दीपिकाने गळफास घेतल्याचे सांगितले. त्याच्या एक तास अगोदर सौरवने फोनवर धमकी दिली की, मला तिच्यासोबत काडीमोड घ्यायचा आहे, तुम्ही तिला घेऊन जा. राहूलच्या मते, गुरूवारी महिलेचा परिवार भटिंडा येथे गेला असता पोलिसही त्यांच्यासोबत होते. दीपिकाला रोज मारहाण होत असल्याचे शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. आरोपी सौरवने दीपिकाचा गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर तिला फासावर लटकवले असल्याचे राहूलने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांना माहिती न देता स्वतःच मृतदेहाला खाली उतरवून सरकारी रूग्णालयात नेले. 

ईएमओचे डॉ.अमित कंबोज यांनी सांगितले की, दुपारी एक व्यक्ती आणि त्याचा शेजारी एका महिलेचा मृतदेह घेऊन आले होते. त्यावेळी हे आत्महत्येचे प्रकरण वाटत होते. पण तिला तपासले असता तिचा मृत्यू होऊन बराच वेळ झाल्याचे आढळून आले. तेथील डॉक्टरांना संशय येताच त्यांनी महिलेचे पोस्टमार्टम करण्याचे सांगितले असता सौरवने मृतदेह घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांच्या मदतीने मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

 

लग्न झाल्यापासून करत होता महिलेचा छळ

दीड वर्षापूर्वी सौरव सोबत दीपिकाचा विवाह झाला होता. सौरव पोस्टात नोकरी करतो. लग्नाच्या काही दिवसांनी सौरवची भटिंडा येथे बदली झाली होती. दीपिकाच्या लग्नात घरच्यांनी फर्नीचर सोडून सर्व काही दिले होते. दीपिकाच्या भावाने सांगितले की, लग्नाच्या काही दिवसांनंतरच हुंड्यासाठी दीपिकाचा छळ करण्यास सुरुवात केली होती. दररोज तिला मारहाण करण्यात येत होती. याबाबत दोन्ही परिवारांनी बैठक घेऊन समस्येचे निराकरण केले होते. काही दिवसांपर्यंत सर्व सुरळीत सुरू होते. पण सौरवने पुन्हा दीपिकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. लग्नात फर्निचर न दिल्यामुळे आणि स्कूटीच्या मागणीवरून तिचा छळ करत होता. सौरवची मागणी पूर्ण न केल्यामुळे आरोपीने दीपिकाची हत्या केली. 

बातम्या आणखी आहेत...