पत्नीच्या मृत्यूची वार्ता / पत्नीच्या मृत्यूची वार्ता कानी पडताच पतीची गळफास घेऊन आत्महत्या, खैरी येथील घटना

प्रतिनिधी

Mar 05,2019 07:36:00 PM IST

राळेगाव- तालुक्यातील खैरी येथील एका 28 वर्षीय युवकाने पत्नीच्या मृत्यूची बातमी कळताच स्वतः ही गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना मंगळवार, ५ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. दीपक अजाब पवार (वय- 28 वर्षे, रा. खैरी) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, सहा वर्षांपूर्वी मृतक दीपक पवार याचा चंद्रपूर येथील एका मुलीशी विवाह सोहळा पार पडला होता. दरम्यान, रोजमजूरी करून दोघांचाही गुण्यागोविंदाने संसार सुरू होता. असे असताना काही महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीला एका आजाराने ग्रासले, अशातच तीच्यावर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवार, 4 मार्च रोजी सायंकाळी पत्नीचा मृत्यू झाला. ही वार्ता दीपकच्या कानी पडताच त्याने स्वतःच्या घरी कुणीही नसल्याची संधी साधून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

ही घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली असून, दोघाही पती पत्नीचे अतूट प्रेम असल्याचे शेजाऱ्यांकडून घटनास्थळी बोलल्या जात होते. या घटनेची माहिती खैरी येथील विनोद माहूरे यांनी वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रशांत गिते यांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला होता. या प्रकरणी वडकी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून, खैरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. या प्रकारामुळे खैरी परीसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

X
COMMENT