आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेच्या ओव्हरहेड केबलला स्पर्श करून पतीची आत्महत्या; पत्नीला प्रवाशांनी वाचवले, पळून जाऊन केला होता प्रेमविवाह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही गेला जीव

नागपूर- रेल्वेगाडीच्या डब्यावर चढून पतीने इलेक्ट्रिकच्या केबलला स्पर्श करून आत्महत्या केली, तर त्याच्या पत्नीला सुरक्षारक्षकांनी आत्महत्या करण्यापासून परावृत्त करत तिची सुटका केल्याची थरारक घटना नागपूर रेल्वेस्थानकावर घडली. पळून जाऊन लग्न करणाऱ्या या जोडप्याने जवळचे पैसे संपल्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.
बिरबल पहारिया (२५) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे, तर त्याच्या पत्नीचे नाव ज्ञानदेवी (१९) आहे. दोघेही ओडिशा राज्यातील रहिवासी आहेत. दहा दिवसांपूर्वी दोघांनी प्रेमविवाह करून घर सोडले होते. ते डोंगरगडला गेले व तेथून नागपुरात आले. जवळचे पैसे संपल्याने विवंचनेतूनच त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी रात्री दोघे रेल्वेस्थानकावर आले. तेथे उभ्या असलेल्या विशेष गाडीच्या छतावर उतरण्यासाठी दोघांनी चक्क फूट ओव्हर ब्रिजचा वापर केला. त्या वेळी तेथे तैनात रेल्वे प्रवासी व कर्मचाऱ्यांनी आरडाओरड करून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्नदेखील केला. मात्र, बिरबलने फूट ओव्हर ब्रिजवरून गाडीच्या छतावर उडी घेत ओव्हरहेड इलेक्ट्रिक केबलला स्पर्श केला. विजेचा जोरदार धक्का बसल्याने बिरबल गाडीवरून खाली पडला व त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्याच वेळी फूट ओव्हर ब्रिजला लटकलेल्या ज्ञानदेवीला पकडून आत्महत्येपासून परावृत्त करण्यात रेल्वे प्रवाशांना यश आले.

वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही गेला जीव


रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, बिरबल हा गाडीच्या छतावर उडी मारण्याचा प्रयत्न करत असताना काही कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत ओव्हरहेड केबलमधील वीजपुरवठा खंडितही केला होता. मात्र, तरीही केबलमध्ये राहिलेल्या विजेच्या प्रवाहाचा भार खूपच जास्त असल्याने त्याचा जबरदस्त झटका बिरबलला बसला व त्यातच त्याचा मृत्यू झाला.लोहमार्ग पोलिसांनी या घटनेतून बचावलेल्या ज्ञानदेवीची चौकशी केल्यावर तिने आत्महत्येमागील कारण सांगितले. तिला तूर्तास शासकीय वसतिगृहात ठेवण्यात आले आहे. ओडिशामधील तिच्या नातेवाइकांशी संपर्क साधला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...