आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मदीना : सौदी अरेबियात एका व्यक्तीने आपल्या बायकोचा पाहताच त्याने घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. सदर घटना व्यक्तीच्या लग्नाच्या रात्रीच घडली. या जोडप्याने याआधी एकमेकांचा चेहरा पाहिला नव्हता. यामुळे ही वेळ ओढावली. या घटनेनंतर लोकांनी सोशल मीडियावर नवरदेवावर चांगलीच नाराजी दर्शवली.
यामुळे घेतला लग्नाच्या पहिल्याच रात्री घटस्फोट देण्याचा निर्णय
> सौदी अरेबियातील मदीना शहरामध्ये एक व्यक्तीने आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री आपल्या पत्नीचा चेहरा पाहताच त्याने तिथेच तिला घटस्फोट दिला.
> लग्नादरम्यान फोटोग्राफरने फोटो काढण्यसाठी वधूला आपला बुरखा काढायला सांगितला. यानंतर नकाब काढल्यानंतर नवरदेवाने प्रथमच तिचा चेहरा पाहिला.
> वधूचा चेहरा पाहताच नवरदेवाला मोठा धक्का बसला. तो जागेवरच उभा राहिला आणि म्हणाला की, ''मी ज्या मुलीची कल्पना केली होती ती ही ती मुलगी नाही. मला क्षमा कर पण मी तुझ्यासोबत नाही राहू शकत. मी तुला घटस्फोट देतो.''
> नवरदेवाच्या अशा बोलण्यामुळे वधूला जबरदस्त धक्का बसला. नकार देण्याचे नेमके कारण तिला समजले नव्हते. यामुळे रडून रडून तिची अवस्था वाईट झाली होती. दूसरीकडे याबद्दबल नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांनी नवरदेवाला समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही एक फायदा झाला नाही. नवरदेव आपल्या व्यक्तव्यावर ठाम आहे.
सोशल मीडियावर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया
> धोका देणाऱ्या नवरदेवाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. बातमी पसरताच लोकांनी सोशल मीडियावर मुलावर निशाणा साधला. विशेषतः महिला युझर्सनी त्याची चांगलीच खरडपट्टी काढत त्याच्यावरचा राग व्यक्त केला.
> एका युझरने लिहिले की, 'सदर व्यक्तीने आपल्या बेजबाबदारीमुळे त्या मुलीला मोठ्या संकटात टाकले आहे. त्याला याची शिक्षा मिळायलाच हवी.'
> दुसऱ्याने लिहिले की, 'त्या व्यक्तीने मुलीचा चेहरा पाहण्याऐवजी तिचे मन पहायला हवे. दुर्दैवाने आजकाल अनेक युवक मुलींचा फक्त चेहराच पाहतात आणि मुलीचे मुल्य आणि नैतिकतेकडे दुर्लक्ष करतात.'
> तिसऱ्याने लिहिले की, 'तो व्यक्ती आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी तयार नाही. तो पूर्णपणे असंवेदनशील आहे. देव त्या मुलीला चांगला वर देवो.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.