आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला मित्रांसोबत संबंध ठेवायला मजबूर केले पतीने, नकार दिल्यावर केली बेदम मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंड - उत्तराखंडच्या ऊधमसिंह नगर जिल्ह्यातील काशीपूरमध्ये एका विवाहितेला तिच्याच पतीने आपल्या मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी मजबूर केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. विवाहित महिलेने आपल्या पतीवर आरोप ठेवला आहे की, तो स्वत: मित्रांच्या बायकांशी संबंध ठेवायचा, त्या बदल्यात मलाही त्याच्या मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी मजबूर करायला लागला होता. पीडितेचे म्हणणे आहे की, पतीच्या सांगण्यावरून 2 जण तिच्या खोलीत घुसले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तिने याचा विरोध केला तेव्हा पतीने तिला बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकीसुद्धा दिली. 

 

पतीचे मित्राच्या बायकांशी संबंध, म्हणून पत्नीलाही तसेच करण्याचा दबाव
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पीडित महिला म्हणाली की, वर्षभरापूर्वीच तिचे लग्न मुरादाबादच्या तरुणाशी झाले होते. तिचा पती आणि सासरची माणसं व्यवसायानिमित्त दिल्लीतच राहतात. लग्नाच्या काही महिन्यांनीच पतीही तिला आपल्यासोबत दिल्लीला घेऊन आला. दिल्लीत आल्यावर महिलेला कळले की, तिचा पती पत्नी बदलणाऱ्या क्लबचा सदस्य आहे. महिलेचा आरोप आहे की, पतीचे अनेक महिलांशी अवैध संबंध आहेत. एवढेच नाही, या महिला आणि त्यांच्या पतींचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे आहे.

 

2  जण खोलीत शिरले आणि बलात्काराचा प्रयत्न करू लागले...
पीडित विवाहिता म्हणाली, पतीने स्वत:च आपल्या संबंधांबाबत माहिती सांगितली आणि म्हणाला की, तुलाही माझ्या मित्रांशी संबंध ठेवावे लागतील. पीडिता म्हणाली की, विरोध केल्यावर पतीने तिला अनेकदा मारहाण केली. चकित करणारी बाब म्हणजे सासू आणि दिरांना तक्रार केल्यावर त्यांनीही घरात शांतता ठेवून पती सांगतो तसे करण्याचा सल्ला दिला. महिला पुढे म्हणाली की, एका रात्री त्यांच्या रूममध्ये दोघे घुसले. त्या वेळी तिचा पती घरात एकटाच होता. त्या दोघांनी बलात्काराचा प्रयत्न केला. बचावासाठी महिलेने आरडाओरडा केला असता दोघांशी तिची बाचाबाची झाली. महिलेचा आरडाओरडा ऐकून तिचा पतीही खोलीत आला. या दोघांना संबंध न बनवल्याने नवऱ्याने पत्नीलाच पुन्हा बेदम मारहाण केली. कशीबशी पतीच्या तावडीतून सुटून विवाहिता माहेरी पळून गेली. पीडितेच्या तक्रारीवरून महिला हेल्पलाइनमध्ये काउंसलिंग करण्यात आली, परंतु आरोपी पक्ष जबाब देण्यासाठी आला नाही. शुक्रवारी पोलिसांनी कलम 376, 511, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...