आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकाने SP ऑफिसमध्ये प्राषण केले विष, सुसाइड नोटमध्ये लिहीले- मला हे करताना खूप लाज वाटत आहे, पण माझ्या पत्नीने माझ्यासमोर दुसरा कोणता पर्याय ठेवला नव्हता, तिला जे हवे होते ते मी नाही देऊ शकत...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हनूमानगड(राजस्थान)- पत्नी आणि तिच्या घरच्यांच्या त्रासाला कंटाळून सोमवारी सकाळी एका युवकाने एस.पी. कार्यालयात विष प्राषण करून आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. विष पिल्याने युवकाला गंभीर अवस्थेत जिल्हा रूग्णालयात भर्ती केले गेले. ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारानंतर त्याला आयसीयूत शिफ्ट केले. युवकाच्या खिशातून चारपाणी सुसाइड नोट मिळाली आहे, ज्यात त्याने आत्महत्त्या करण्यामागे सासरच्या लोकांचा हात असल्याचे सांगितले आहे. त्याने चिठ्ठीत सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल लिहीले आहे. सध्या पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत. 

 

रोहित धौंसी(30) सकाळी साडे अकरा वाजता एसपी कार्यालयात गेला आणि जोराने ओरडून आपल्या सासरच्या लोकांवर आरोप करू लागला. या आरडा-ओरड दरम्यान त्याने खिशातून विषाची बाटली काढून विष प्राषण केले. त्याचा आवाज ऐकून ए.एस.पी. चंद्रेश गुप्ता ऑफीसमधून बाहेर आले, तोपर्यंत त्याने विष प्यायले होते, पोलिसांनी त्याला तत्काळ जिल्हा रूग्णालयात भर्ती केले. साक्ष देण्याच्या मनस्थीतीत नसलेल्या रोहितला आधी ट्रॉमा सेंटर आणि नंतर आयसीयूत भर्ती केले. दुपारी युवकाची आई रूग्णालयात पोहचली.

 

रोहितने लिहीली सुसाइड नोट

''माझे लग्न 10 वर्षांपूर्वी बठिंडाच्या मंजूसोबत झाले होते. लग्नानंतर मंजूने मला मारहाण सुरू केली. तिचे ऐकले नव्हते म्हणून माझ्यावर खोटी तक्रार दाखल केली आणि यात तिच्या घरच्यांनिही तिची मदत केली. या पूर्ण प्लॅनमध्ये माझी सासू रामवती, पंजाब पोलिसांत कार्यरत असलेला मोठा मेहुणा राजीव कश्यप, तिन्ही मेहुण्या संतोष, सुमन आणि सरोज ज्यांची लग्न झालेली आहेत, हे सगळे सामिल आहेत. ते सर्व पोलिसांची धमकी देउन माझ्याकडून पैसे उकळू पाहत होते. माझा मेहुणा राजीव कश्यपवर एक गुन्हा दाखल असून सध्या तो जामिनावर बाहेर आहे. दूसरा म्हेउना पवन रेल्वे एनडीपीएसच्या केसमध्ये तुरूंगात जाउन आला आहे. माझ्या पत्नीने बंठिंडा कोर्टात कौटुंबीक हिंसेची तक्रार दाखल केली आहे. त्यांची मागणी खूप जास्त आहे आणि ती मी पुर्ण नाही करू शकत. एसपी साहेब सर्व जिल्ह्याच्या सुरक्षेची जबाबदारी तुमच्यावर आहे, त्यामुळे तुम्ही माझीदेखील रक्षा करा. मला मेल्यानंतर न्याय मिळून द्या. तुम्ही सिद्ध करा की, खाकी वर्दी न्यायासाठी असते, ब्लॅकमेलींगसाठी नाही.'' -रोहित धौंसी 

बातम्या आणखी आहेत...