Home | National | Madhya Pradesh | Husband want divorce because his wife's obesity

पत्नीच्या लठ्ठपणाची उडवतात खिल्ली म्हणून पतीला हवाय घटस्फोट; तर पत्नीने सांगितले वेगळेच कारण

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 24, 2019, 11:49 AM IST

पती व पत्नीचे युक्तिवाद ऐकल्यानंतर जजचे समुपदेशनाचे आदेश

 • Husband want divorce because his wife's obesity

  भोपाळ - भोपाळच्या कौटुंबिक न्यायालयात पत्नीच्या लठ्ठपणाला कंटाळून पतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. लग्नात पत्नी सडपातळ होती. तिने स्वत: लक्ष दिले नाही. त्यामुळे पत्नी लठ्ठ झाली. आता लोक माझी खिल्ली उडवतात. पत्नीमुळे मला मानसिक त्रास होतो. पत्नीला योगासनाचा वर्ग लावला. घरी ट्रेडमिल विकत घेऊन दिले. ती सडपातळ व्हावी म्हणून काही औषधे विकत आणली. पत्नीवर सुमारे पाच लाख रुपये खर्च झाले. काहीतरी कारण सांगून डाएटचे पालन करत नाही. तर पत्नी म्हणाली, नवऱ्याचे कॉलेजमध्ये गर्लफ्रेंडशी संबंध आहेत. त्यामुळे त्याला घटस्फोट हवा आहे. न्यायाधीशांनी या प्रकरणात समुपदेशन करण्याचे आदेश दिले आहेत.

  महाशय म्हणाले-लग्नात वजन होते ५६ किलो आता १०२ किलो -

  पतीने समुपदेशकास सांगितले, आमच्या लग्नाला दहा वर्षे झाली. तेव्हा पत्नीचे वजन फक्त ५६ किलो होते. मुलाच्या जन्मानंतर तिचे वजन वाढण्यास सुरुवात झाली. तिला जीम लावली. डॉक्टरांनाही दाखवले. परंतु पत्नीने स्वत:चया प्रकृतीकडे लक्षच दिले नाही. तिचे वजन आता १०२ किलो आहे. आम्ही कोठेही गेलो तर लोक हसतात.

  ‘सून नव्हे, प्रेयसीसारखी राहते, ती कुंकू लावत नाही, साडी वापरते नाही’

  एका अन्य प्रकरणात पोलिस अधिकाऱ्याच्या मुलीने पतीवर भोपाळ न्यायालयात उदरनिर्वाहाचा दावा दाखल केला आहे. न्यायालयाने समुपदेशन केले तेव्हा समजले, पतीने राजस्थानच्या न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे. कारण त्याची पत्नी सून म्हणून वावरत नाही. तो राजस्थानचा असून लग्नानंतर मुली साडी नेसतात. त्याची बायको कुंकूही लावत नाही आणि साडी नेसत नाही. तर पत्नी म्हणाली, मी मुंबईची आहे. लग्नाआधीच आपल्यासोबत कंपनीत नोकरी करीन, असे ठरले होते. पण त्याने नंतर नकार दिला. समुपदेशकांनी सांगितले, दोघेही ऐकण्यास तयार नाहीत. आपसात तडजोड करून घटस्फोट घेण्यास तयार आहेत.

Trending