Home | Khabrein Jara Hat Ke | husband want housekeeping, Wife submits divorce case in court

पत्नीकडे घरखर्च मागणे पतीला पडले महागात; पत्नीने चक्क कोर्टात दिला घटस्फाेटासाठी अर्ज

वृत्तसंस्था | Update - Apr 12, 2019, 11:40 AM IST

पतीच्या कंजूसपणाला कंटाळल्यामुळे घटस्फाेट हवा - पत्नी

  • husband want housekeeping, Wife submits divorce case in court
    दुबई - संयुक्त अरब अमिरातमध्ये (यूएई) एका पतीने त्याच्या पत्नीकडे विजेचे बिल व घरखर्चासाठी पैसे मागितले असता तिने चक्क अबुधाबी येथील डिपार्टमेंट ऑफ फॅमिली काेर्टात धाव घेऊन घटस्फाेटासाठी अर्ज केला. विशेष म्हणजे, दाेघांचे लग्न तीन अाठवड्यांपूर्वीच झाले हाेते. याबाबत संबंधित महिलेने दिलेल्या माहितीनुसार तिचा पती मूळचा इराणी नागरिक असून, ताे तिच्यापेक्षा १३ वर्षांनी लहान आहे. तसेच ताे अत्यंत कंजूस असून, त्याने लग्न झाल्यापासून एकही दिरहम (यूएईचे चलन) खर्च केला नाही. लग्नाच्या पहिल्याच दिवशी त्याने मला पाणी व वीजबिलासह संपूर्ण घरखर्च उचलण्यास सांगितले. त्याच्या या कंजूसपणाला कंटाळून मला त्याच्यापासून घटस्फाेट हवा आहे, असे तिने काेर्टात सांगितले.

Trending