Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Husband-wife are seriously injured in assassination of dacoits

दरोडेखोरांच्या मारहाणीत पती-पत्नी गंभीर जखमी; रात्री साडेअकराच्या सुमारास दरोडा

प्रतिनिधी | Update - Aug 29, 2018, 11:49 AM IST

जामखेडजवळील धोत्री गावात सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दरोडा पडला. सात ते आठ दरोडेखोरांनी पती-पत्नीवर सत्तूरने वार

  • Husband-wife are seriously injured in assassination of dacoits

    जामखेड शहर- जामखेडजवळील धोत्री गावात सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दरोडा पडला. सात ते आठ दरोडेखोरांनी पती-पत्नीवर सत्तूरने वार करून गंभीर जखमी केले. सुमारे ७५ हजारांचा सोन्या-चांदीचा ऐवज त्यांनी लांबवला. जखमींना मध्यरात्री नगरला हलवण्यात आले. अजिनाथ निवृत्ती जाधव व नर्मदा अजिनाथ जाधव अशी जखमींची नावे आहेत.


    दादासाहेब आजीनाथ जाधव (२९, जाधव वस्ती, धोत्री शिवार, जामखेड) हे सोमवारी रात्री कुटुंबीयांसमवेत झोपले असताना चार दरोडेखोरांनी घराचा दरवाजा लाथा आणि दगड मारून उघडला. दरोडेखोरांनी दादासाहेब व त्यांची पत्नी शीतल यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. घरातील कपाट उघडून करून त्यातील तीन तोळ्यांचे डोरले, गंठण, झुंबर जोड व तीन विविध कंपन्यांचे मोबाइल असा ७४ हजारांचा ऐवज दरोडेखोरांनी काढून घेतला. दादासाहेब यांचे वडील आजीनाथ निवृत्ती जाधव व आई नर्मदा यांनी दरोडेखोरांना विरोध केला असता त्यांना सत्तूर व लोखंडी पासने डोक्यात व छातीवर मारहाण करण्यात आली. नंतर दरोडेखारांनी पळ काढला.


    घटनेची माहिती समजताच गावातील लोक मदतीसाठी धावून आले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अजिनाथ जाधव यांना जास्त मार लागला असल्यामुळे प्रथमोपचार करून त्यांना नगरला हलवण्यात आले. पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार व उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी घटनास्थळास भेट दिली. गेल्या आठवड्यातच आयकॉन अपार्टमेंटमधून चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम चोरली होती. १५ दिवसांपूर्वी बाजार समितीतील आडत दुकान, राजुरी येथील कॅनरा बँक, खर्डा येथील कापड दुकान, तसेच चंद्रकांत ढवळे यांच्या घरी दिवसाढवळ्या चोरी झाली.

Trending