Home | Business | Business Special | Husband wife co-founded company now has turnover of 12 crore rs in just two years

2 वर्षांपूर्वी व्यवसायात झाला होता 40 लाखांचा तोटा, आता आहे 12 कोटी टर्नओव्हर असलेल्या कंपनीची मालकीन...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 09, 2018, 02:07 AM IST

दिप्तीने हारलेला डाव जिंकून मांडला जगासमेर आदर्श.

 • Husband wife co-founded company now has turnover of 12 crore rs in just two years


  नवी दिल्ली- दिप्तीची गोष्ट एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाहिये. ती आज 12 कोटींचा रेवेन्यू असलेली कंपनी आउटडोर अॅडवर्टाइजिंग स्टार्टअप Gohoardings.com ची फाउंडर आहे. पण एके काळी ही कंपनी सुरू करताना झाला होता 40 लाखांचा तोटा, ज्यानंतर त्या खुप डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. त्यांना कळत नव्हते की, या कर्जातून बाहेर कसम यावे. पण नंतर त्यांनी मेहनतीने त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे.


  दिप्तीने परिस्थीतीवर मात केली

  दिप्तीने 2014 मध्ये सीए सोडून काहीतरी नवीन करण्याचा विचार केला होता. त्यावेळी तिला एक मोठा इव्हेंट ऑर्गनाईज करण्याचा संधी मिळाली, ज्यात अनेक मोठ्या सेलेब्रेटीज येणार होत्या. तिने पार्टनरशिपमध्ये या इव्हेंटला करण्याचे ठरवले होते. पण या इंव्हेटसाठी तिला स्पॉंसर मिळाले नाही. त्यात तिला 40 लाखांचे नुकसान झाले. त्यानंतर ती खुप डिप्रेशनमध्ये गेली होती. तिला कळत नव्हते काय करावे, पण तिने हार माणली नाही.

  वडिलांनी केली मदत

  दीप्तिने तिच्या वडिलांना झालेल्या नुकसानीबद्दल सांगितले. त्यानंतर तिच्या वडिलांनी घर विकून तिचे कर्ज फेडले. त्यानंतर तिच्या वडिलांनी रागावण्यापेक्षा तिला समजून सांगितले की, हे पैसे गेले आहेत त्यांना बेकार समजु नको ही तुझ्यासाठी शिकवण आहे. तु अजून जोमाने काम कर मी तुझ्या पाठीशी आहे. यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. या घटनेच्या तीन महिन्यानंतर तिचे लग्न विकास सोबत झाले.


  नवऱ्याची मिळाली सोबत
  विकास एक सॉफ्टवेअर इंजीनिअर आहे आणि मल्टीनेशनल कंपनीत नोकरी करत होता. त्या दोघांची स्वप्ने व्यवयात होती म्हणून विकासनेही नोकरी सोडली आणि छोट्या मोठ्या कंपन्यांसाठी फ्रिलांसिंग करू लागला. एक दिवस विकास एका प्रॉजेक्टवर काम करत होता जिथे त्याच्या क्लायंटला होर्डिंग्स लावायच्या होत्या. तेव्हा विकासने विचार केला की आपण आउटडोअर अॅडव्हरटायझिंग कंपनी सुरू केली पाहीजे, आणि त्यानंतर त्याने दिप्तीसोबत मिळून त्यांची एक आउटडोअर अॅडव्हरटायझिंग कंपनी स्थापन केली.

  50 हजारात सुरू केली कंपनी
  जेव्हा त्यंनी ही कंपनी स्थापन करण्याचा विचार केला तेव्हा त्यांच्याकडे जास्ती पैसे नव्हते, त्यावेळी त्यांनी फक्त 50 हजार इंनव्हेस्ट करून कंपनी सुरू केली, आणि फक्त 2 वर्षात कंपनीचा टर्नओव्हर 12 कोटींचा झाला.

Trending