आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Suicide Note: 'एकटाच मरणार होतो; पत्नी म्हणाली, मी कुणासाठी जगू?' लग्नाचे कपडे घातले, मग उचलले टोकाचे पाऊल...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सागर - मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील एका गावात पोलिसांना पती-पत्नीचे मृतदेह सापडले आहेत. या दोघांच्या शरीरावर वर आणि वधूचे कपडे होते. दोघे अगदी नववधू आणि नवरदेवप्रमाणे नटले होते. दोघांचेही मृतदेह एकाच साडीच्या फासाला लटकले होते. महिलेच्या बांगड्यांमध्ये एक सुसाइट नोट सापडला आहे. त्यामध्ये दोघांनी आत्महत्येचे कारण सांगितले. दोन पानांच्या या मृत्यूपत्रात पती तेजरामने आपल्या लहाण्या भावाला आई-वडिलांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सोबतच पोलिसांनी देखील कुटुंबियांना किंवा कुणालाही या घटनेसाठी जबाबदार धरू नये असे त्यांनी लिहिले. 


एकटाच मरणार होतो...
पोलिसांना मिळालेला सुसाइट नोट पती तेजराने लिहिला होता. दोघांनी आत्महत्या का केली याचे कारण सुद्धा त्याने यात लिहिले आहे. त्यानुसार, "मी गेल्या अनेक दिवसांपासून आजारी आहे. उपचारावर खर्च करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. मी एकटाच गळफास घेऊन आत्महत्या करणार होतो. ही गोष्ट माझ्या पत्नीला कळाली तेव्हा तिने तुम्ही गेल्या मी कुणासाठी जगणार असे विचारले. खूप समजावून सांगितले. परंतु, तिने माझ्यासोबत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे, मरण्यापूर्वी आम्ही लग्नाचा पोशाख घातला आणि एका नवरदेव आणि नववधूसारखे नटलो. यानंतर एकाच साडीने गळफास घेत आहोत." असे तेजरामने स्पष्ट केले.


गंभीर आजार नव्हे, फक्त खाज-खुरजने त्रस्त होता तेजराम!
सागर जिल्ह्यातील खमरिया टोला गावात राहणारा 22 वर्षीय तेजराम केवट आणि पत्नी 20 वर्षीय ओमवतीबाई या दोघांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी 7 वाजता त्यांच्या घरात सापडले. यानंतर पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांनी दोन्ही मृतदेह फासावरून काढून शवविच्छेदनासाठी पाठवले आणि त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी कुटुंबियांकडे दिले. कुटुंबिय या दोघांच्या आत्महत्येवर हैराण आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, तेजरामला इतका गंभीर आजार नव्हता की त्याने कंटाळून आत्महत्या करावी. त्याला केवळ खाज-खरुज झाली होती. त्यामुळे, या आत्महत्येची चौकशी व्हायला हवी. 

 

3 दिवसांपूर्वीच माहेरून परतली होती ओमवती
आत्महत्या करणारी पत्नी ओमवती रक्षाबंधनासाठी आपल्या माहेरी गेली होती. तसेच 3 दिवसांपूर्वी परतली होती. ओमवतीच्या काकांनी सांगितल्याप्रमाणे, एप्रिल महिन्यातच त्या दोघांचा विवाह झाला होता. ओमवती आपल्या पतीसोबत खुश होती. तेजराम मिस्त्री म्हणून काम करत होता. या कामातून तो आपले घरखर्च व्यवस्थित पूर्ण करत होता. त्यांनाही या आत्महत्येवर काही प्रश्न पडले होते. पोलिस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...