आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन मुलांचा गळा आवळून आई-वडिलांनी केली आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भीलवाडा(राजस्थान)- येथील खेडा गावात शुक्रवारी दुपारी एका व्यक्तीने आपल्या दोन मुलांचा गळा आवळून खून केल्यानंतर पत्नीसोबत मिळून आत्महत्या केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आर्थिक अडचण आणि बेरोजगारीमुळे आत्महत्या केली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मांडल एसएचओ गजेंद्रसिंह यांनी सांगितले की, 30 वर्षीय सुरेश माली आपल्या वडिलांच्या घरातील एका बाजुला पत्नीसोबत राहत होता, तर घराच्या दुसऱ्या बाजुला त्याचा भाऊ आणि आई-वडील राहायचे.


शुक्रवारी दुपारी ते चौघे रूममध्ये झोपायला गेले. दररोज दुपारी 3 वाजता ते पाणी आणण्यासाठी जायचे. शुक्रवारी ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बाहेर आले नाहीत, त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला आवाज दिला. कोणी बाहेर आले नाही म्हणून कुटुंबीयांनी जाऊन पाहीले. त्यांना लटकलेल्या अवस्थेत पती-पत्नी आणि जमिनीवर पडलेले त्यांची मुले पायल आणि योगेश दिसले. 


प्राथमिक तपासात समोर आले आहे की, सुरेश एका वर्षापूर्वी एका फॅक्टरीमध्ये काम करत होता. सध्या त्याने उज्जवला योजनेत फॉर्म भरल्यामुळे घर चालवायचा. पण जास्त कमाई नसल्यामुळे त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागायचा.