आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Husband Wife Death And Funeral On Same Time In Bihar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलांनी संपत्तीसोबत आई-वडिलांचीही केली वाटणी, पण मृत्युने केले दोघांना एकत्र, एकाच वेळी झाला अंत्यसंस्कार...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवादा(बिहार)- मुलांनी प्रॉपर्टीसोबतच वृद्द आई-वडिलांचीही वाटणी केली. पण अनेक वर्षे एकाच घराद वेगवेगळे राहील्यानंतर मृत्युने दोघांना एकत्र केले. हैराण करणारी बाब म्हणजे 104 वर्षांचे नित्या आणि त्यांची पत्नी सितबिया देवी यांचा मृत्यु काही मिनीटांच्या अंतराने झाला.


दाम्पत्याला चार मुले होती. काही वर्षांपूर्वी चौघांनीही संपत्तीच्या वाटणीसोबतच आई-वडिलांचीही वाटणी केली होती. तेव्हापासून ते दोघे वेगवेगळे राहयचे. शनिवारी सकाळी नित्या यांच्या पत्नीचे दिर्घ आजाराने निधन झाले, तर काही मिनीटातच पतीनेह जीव सोडला.

 

रडत-रडत सोडला श्वास
पत्नीच्या जाण्याने नित्या यांना रडु आवरता आले नाही आणि काही वेळातच त्यांचीही प्राणज्योत मावळली. त्यानंतर सोबतच त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली सोबतच मुकाग्नी देण्यात आली.