आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Husband Wife Death In Same Day Husband Dead After Wife\'s Funeral

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका झटक्यात 4 मुलांच्या डोक्यावरून उडाले आई-वडिलांचे छत्र, पत्नीला मुखाग्नी देऊन घरी आल्यावर झाला पतीचा मृत्यु, पत्नीच्या बाजुलाच झाला अंत्यसंस्कार...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेतिया(बिहार)- पत्नीचा मृत्यु सहन न झाल्यामुळे पतीनेही श्वास सोडला. माहिती मिळताच नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली. गावकऱ्यांच्या मदतीने पतीचाही केला अंत्यसंस्कार. गावात वेगळ्याच चर्चेला आले उधान.


असा झाला पत्नीचा मृत्यु 
सोमवारी गेन्हरिया भवानीपुर गावात राहणाऱ्या जगदीश साह यांची पत्नी प्रतिमा देवी उस कापणीसाठी गेल्या होत्या. रात्रीपर्यंत घरी आल्या नाही त्यानंतर सगळ्यांनी शोधाशोद सुरू केली. दुसऱ्या दिवशी एका शेतात त्यांचा मृतदेह मिळाला.


पत्नीला मुखाग्नी देण्यासाठी आजारी पतीला नेले स्मशानभुमीत 
जगदीश शाह विगत अनेक दिवसांपासून आजारी होते. नातेवाईकांनी त्यांना त्याच परिस्थीत स्मशानभुमीत पत्नीला मुखाग्नी देण्यासाठी घेऊन गेले. तेथे मुखाग्नी दिल्यानंतर त्यांची तब्येत खराब झाली आणि त्यांनी घरी आणण्यात आले. घरी आणताच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  


पत्नीच्या बाजुला झाला अंत्यसंस्कार 
गावकऱ्यांनी सांगितले की, प्रतिमा यांचा अंत्यसंस्कार आटोपून आम्ही घरी आलो की, लगेच जगदीशच्या मृत्युची माहिती मिळाली. नंतर त्याच दिवशी त्यांचाही अंत्यसंस्कारत पत्नीच्या बाजुलाच करण्यात आला.


चार मुले झाली अनाथ 
एका झटक्यात 4 मुलांवरून आई-वडिलांचे छत्र उडाले.