आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोघे म्हणाले आत्महत्या करू! पण पत्नीची हिम्मत झाली नाही तर पतीनेच तिचा गळा चिरून स्वतःच्या हाताची नसही कापली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुग्राम - गेल्या शनिवारी घरामध्ये हाताची नस कापल्याने बेशुद्धावस्थेत आढळलेल्या 77 वर्षीय हार्नेक सिंग धिल्लन यांना पोलिसांनी 74 वर्षीय पत्नी गुरमेल कौरच्या हत्ये प्रकरणी अटक केली आहे. कौर या बेडवर गळा कापलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या होत्या. यासंपूर्ण घटनेबाबत हार्नेकसिंग यांनी दिलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. पती पत्नी दोघांमध्ये आत्महत्या करण्याचे ठरले होते. पण पत्नीची हिम्मत झाली नाही म्हणून तिचा गळा चिरला आणि मग नंतर त्यांनी स्वतःच्या हाताची नस कापून घेतली. 


यामुळे घेतला आत्महत्येचा निर्णय..
धिल्लन यांनी सांगितले की, त्यांच्या ओळखीचे जसकरण सिंग (51) हे व्यक्ती काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाले होते. धिल्लन यांच्या घरी येऊन गेल्यानंतरच ते बेपत्ता झाले होते. त्यामुळे जसकरण यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या बेपत्ता होण्यामागे धिल्लन यांचा हात असल्याचा आरोप करत पोलिसांत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. जसकरणचे कुटुंबीय घरी येऊन शिवीगाळ करत होते आणि बराच गोंधळ घालत होते. यासंपूर्ण प्रकारामुळे धिल्लन पती पत्नी तणावात होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला होता, असे त्यांनी सांगितले. 


पत्नीची हिम्मत झाली नाही...
धिल्लन म्हणाले की, जसकरण बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाचा आरोप आमच्यावर येत असल्यामुळे आम्ही दोघे प्रचंड तणावात होतो. त्यामुळे आम्ही दोघांनी आत्महत्या करण्याचे ठरवले होते. मात्र प्रत्यक्ष आत्महत्या करायची होती त्यावेळी पत्नी गुरमेल कौर हिची आत्महत्या करण्याची हिम्मतच होत नव्हती. त्यामुळे हार्नेक यांनी स्वतः पत्नीचा गळा चिरला. त्यानंतर त्यांनी स्वतःचा हातही कापून घेतला आणि नंतर तके बेशुद्ध झाले. त्यात हार्नेक हे मात्र बचावले. पोलिसांनी त्यांच्या विरोधात पत्नीची हत्या आणि आत्महत्येचा प्रयत्न असा गुन्हा दाखल केला आहे. 


अज्ञाताचा शोध...
धिल्लन यांचे घर असलेल्या इमारतीच्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये पोलिसांना एक व्यक्ती येऊन गेल्याचे आढळले आहे. पोलिसांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यादिशेनेही शोध सुरू केला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...