आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादमोह (एमपी) - दमोह-जबलपूर हायवेवरील व्यारमा नदीच्या पुलावरून आत्महत्या करण्यासाठी सोमवारी एका दांपत्याने उडी मारली. दोघांनी 3 महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केला होता. या दुर्घटनेत पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला, पती गंभीर जखमी झाला आहे. दोघेही आजीच्या निधनानंतर इंदुरातून घरी परतले होते.
दोन तासांपूर्वी झाले होते आजीवर अंत्यसंस्कार
पोलिसांनी सांगितले की, नोहटा परिसरातील मनोज यादव आपल्या आजीच्या अंत्यसंस्कारात गेले होते. दोन तासांनंतर ते आपल्या पत्नी साधना (वय 22) सोबत पुलावर गेले आणि सोमवारी संध्याकाळी 5 वाजता त्यांनी उडी मारली. या अपघातात साधनाचा मृत्यू झाला, तर मनोज गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल आहे. पोलिसांनी सांगितले, मनोजविरुद्ध जबलपूर नाका चौकीमध्ये रेप, अपहरणासहित अनेक कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. ही तक्रार मुलीच्या कुटुंबीयांनी दाखल केली होती.
मेहुणीला बनवले पत्नी, 2 महिन्यांची होती गर्भवती
- दोघांनी हे पाऊल का उचलले? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
- सूत्रांनुसार, कौटुंबिक कलह कारण असल्याचे सांगितले जाते. साधना 2 महिन्यांची गर्भवती होती. पोलिसांच्या मते, जवळजवळ 3 महिन्यांपूर्वी मनोजने आपला मोठा भाऊ विनोदची मेहुणी साधनाशी प्रेमविवाह केला होता.
- विवाहानंतर मनोज पत्नीसोबत इंदुरात राहून नोकरी करत होता. साधना-मनोजचे नाते आधी भावजी-मेहुणीचे होते, जे नंतर प्रेमसंबंधांत बदलले. यामुळेच दोघांनी कुटुंबीयांच्या मर्जीविरुद्ध पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून मनोज इंदुरात पत्नीसोबत राहून काम करत होता.
- सूत्रांनुसार, प्रेमासाठी या दोघांनी घरच्यांच्या मनाविरुद्ध लग्न केल्याने त्यांना समाजातही टोमणे मारले जात होते. यामुळेच दोघांनी पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
- नोहटा परिसरातील पोलिस स्टेशनचे प्रभारी जिंतेंद्र भदौरिया म्हणाले की, ही घटना संध्याकाळी 5 वाजता घडली आहे. नदीत पाणी नसल्याने दगडांवर आपटलेल्या पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला, पती गंभीर जखमी आहे. पतीच्या चौकशीनंतर पूर्ण प्रकरण स्पष्ट होईल.
पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.