आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Crime: 4 दिवसांपूर्वीच झाले लग्न, अचानक घरात घुसले 10 जण, नवरदेव-नवरीला फरपटत नेऊन केले असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाला (हरियाणा) - 4 दिवसांपूर्वी लग्न करणाऱ्या राहुल आणि त्याच्या पत्नीचे बुधवारी संध्याकाळी 2 कारमधून आलेल्या 10 जणांनी अपहरण केले आहे. अपहरणकर्त्यांनी घरातून राहुलच्या आई वीणा यांना मोबाइलही हिसकावून नेला. कुटुंबीयांनी ताबडतोब पोलिसांनी याची माहिती दिली, परंतु तोपर्यंत किडनॅपर शहरातून पसार झालेले होते. पोलिसांनी राहुलचे वडील सुरेंद्र पाल सिंह यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.


नवदांपत्याला फरपटत नेले कारमध्ये
- वीणा म्हणाल्या, बुधवारी संध्याकाही सव्वा 7 वाजता राहुल आपल्या पत्नीसोबत आपल्या रूममध्येच होता. तेवढ्यात 2 कारमधून 10 जण आले. त्यांनी घरात घुसून त्यांना रिव्हॉल्व्हर दाखवली आणि मारहाण सुरू केली. सगळ्यांनी बळजबरीने राहुल आणि त्याच्या पत्नीला फरपटत नेले आणि कारमध्ये कोंबून फरार झाले.

 

- 4 दिवसांपूर्वीच मुलाच्या लग्नावरून त्यांच्या परिचिताकडे एक फोन आला होता. ते विचारत होते की, राहुल आणि त्याची पत्नी कुठे राहतात? त्यांना संशय आहे की, हा फोन बहुधा राहुलच्या किडनॅपिंगशी संबंधित असू शकतो. कारण ज्यांना फोन आला त्यांनी पत्ता सांगितला होता. त्याच्या ठीक तीन दिवसांनी दोघांचे अपहरण झाले.

 

- एसपी अशोक कुमार यांनी कुरुक्षेत्र, करनाल, पानिपत पोलिसांना अलर्ट केले आहे. असे मानले जात आहे की, किडनॅपर दोघांना घेऊन पानिपत वा आसपासच्या परिसरात लपलेले असू शकतात. सध्या सर्वांचे फोन स्विच ऑफ येत आहे. तथापि, रात्री 12 वाजेनंतर वीणा यांचा फोन ऑन झाला होता, परंतु लगेच बंद झाला.

 

2 डिसेंबर रोजी झाला घटस्फोट, आता केले होते दुसरे लग्न
- रेल्वे कॉलनीत राहणारे राहुल यांचे पहिले लग्न 2013 मध्ये झाले होते. परंतु दोघांमध्ये लग्नानंतर वादविवाद व्हायचा. यावरून अनेकदा मध्यस्थीही झाली, पण वाद मिटला नाही. लोकलाजेस्तव दोघेही 2016 पर्यंत हे नाते सांभाळत होते. मग अचानक 2017 मध्ये पुन्हा दोघांमध्ये दुरावा वाढला आणि डिसेंबर 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

 

- आईवडिलांनी नुकतेच त्याचे एका ठिकाणी स्थळ निश्चित केले. राहुलच्या आई म्हणतात की, आता त्यांनी आपल्या मुलाचे दुसरे लग्न पानिपतच्या नरैणा गावात राहणाऱ्या एका तरुणीशी लावले.

 

राहुलचे वडील एलआयसी एजंट, तर आई आरपीएफमधून निवृत्त
- वीणा म्हणाल्या की, त्यांचे पती सुरेंद्रपाल सिंह एलआयसी एजंट असून त्या स्वत: आरपीएफमध्ये हेडकांस्टेबल होत्या. नुकत्याच त्या निवृत्त झाल्या आहेत. तेव्हापासून त्या घरीच होत्या. अचानक बुधवारी रात्री काय झाले, याची नीट माहिती नाही. परंतु एवढे जरूर माहिती आहे की, एक गाडी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर आणि दुसरी कोणती तरी मोठी गाडी होती.

 

- अंबाला कँटचे डीएसपी बलजीत सिंह म्हणाले, सूचना मिळताच मोबाइल ट्रेसिंगवर लावला. मुलाच्या आईचा नंबर कुरुक्षेत्रमध्ये गेल्यावर बंद झाला. अंबाला पोलिसांनीही सर्व स्पेशल टीमना अलर्ट केलेले आहे. किडनॅप झालेल्या दांपत्याचा शोध सुरू आहे. परंतु आतापर्यंत त्यांचा काहीही शोध लागलेला नाही.  

 

बातम्या आणखी आहेत...