आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुसाइड नोटमध्ये पत्नीला अनेकवेळा आय लव्ह यु लिहून दिली फाशी; दोन पानांच्या या चिठ्ठीत आई-वडीलांविषयी लिहल्या बऱ्याच गोष्टी...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाल- अयोध्यानगर परिसरात मंगळवारी सकाळी एका युवकाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ऋषभ वर्मा (वय30) असे या व्यक्तीचे नाव असून त्याच्या आत्महत्या ठिकाणी पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली आहे. सुसाइड नोट मध्ये त्याने अनेक वेळा त्याच्या पत्नीला आय लव्ह यु लिहले असून, दोन पानाच्या या सुसाइड नोटमध्ये त्याने आपल्या पत्नीला आई-वडीलांना त्रास न देण्याचे लिहले आहे. पोलिसांनी सांगितल्यानूसार काही दिवसांपासून त्याची पत्नी तिच्या माहेरी गेली असून ती एका खासगी कंपनीमध्ये काम करते.

 

सुसाइड नोटमध्ये पत्नीला लिहले आय लव्ह यु

> पोलिसांनी सांगितल्यानूसार, ऋषभ कंपनीमध्ये काम करत होता. तीन वर्षांपूर्वी त्याने प्रेम विवाह केला होता. काही दिवसांपूर्वी पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने पत्नी तिच्या माहेरी निघून गेली होती. पोलिसांना मिळालेल्या सुसाइड नोट्समध्ये ऋषभने अनेकवेळा त्याच्या पत्नीला आय लव्ह यु लिहले आहे.

 

वडीलांनी सांगितले, सकाळी उठल्यानंतर हनुमान मंदिरात दर्शन करायला चाललो

> ऋषभचे वडील लोकेश वर्मा यांनी पोलिसांना सांगितल्यानूसार, तो हनुमानाच्या मंदिरात दर्शनासाठी जाणार होता. त्यानंतर त्याने पहिल्या मजल्यावरील खोलीमध्ये फाशी घेतली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात ऋषभने  त्याच्या पत्नीसोबत झालेल्या वादामूळे आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे.  

बातम्या आणखी आहेत...