Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Husband's murder with help of boyfriend; An incident due to immoral relations in Kolpewadi

प्रियकरच्या मदतीने पतीचा खून; अनैतिक संबंधातून कोळपेवाडीत घटना; दोघांना अटक

प्रतिनिधी | Update - Aug 31, 2018, 11:35 AM IST

अनैतिक संबंधात अडसर येत असल्याने प्रियकरच्या मदतीने पत्नीने पतीचा खून केला. ही घटना कोळपेवाडी परिसरातील सुरेगाव शिवारात

  • Husband's murder with help of boyfriend; An incident due to immoral relations in Kolpewadi

    कोपरगाव- अनैतिक संबंधात अडसर येत असल्याने प्रियकरच्या मदतीने पत्नीने पतीचा खून केला. ही घटना कोळपेवाडी परिसरातील सुरेगाव शिवारात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती तालुका पेालिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी दिली.


    अनिल बाबासाहेब घुसळे (३६ वर्षे, सुरेगाव) असे मृताचे नाव अाहे. आरोपींमध्ये बाळू दिलीप खंडवे (२६ वर्षे) व विलास पुंजाराम कुवारे (४१ वर्षे, सुरेगाव) या दोघांचा समावेश आहे. रमा अनिल घुसळे व बाळू खंडवे यांच्यात अनैतिक संबध होते. या संबंधात रमाचा पती अनिल बाबासाहेब घुसळे याची अाडकाठी होती. रमाच्या सांगण्यावरून बाळू व विलासने २५ ऑगस्टला रात्री ९ वाजता अनिलचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह अर्जुन शेळके यांच्या सुरेगाव शिवारातील शेतातील विहिरीत टाकला, अशी फिर्याद सासू विमल घुसळे यांनी दिली. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित शिवथरे, पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे आदींनी घटनास्थळी भेट दिली. सहायक फौजदार अशोक कुसळकर, हेड काॅन्स्टेबल प्रदीप काशिद, विजय पाटील, असीर सय्यद आदींनी सुरेगाव कोळपेवाडी भागात शोध घेऊन खंडवे व कुवारेे या आरोपींना अटक केली.

Trending