Home | National | Madhya Pradesh | Husband's top not cut, wife put divorce case, said husband is not of my standard

इंजीनिअर पतीने डोक्यावर शेंडी ठेवली म्हणून एमबीए पत्नीने दाखल केला घटस्फोटाचा अर्ज

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 13, 2019, 03:09 PM IST

पत्नी म्हणाली- पतीची शेंडी माझ्या स्टँडर्डच्या खालची आहे, माहेरकडचे मजाक उडवतात

 • Husband's top not cut, wife put divorce case, said husband is not of my standard

  भोपाळ(मध्यप्रदेश)- एका ब्राह्मण कुटुंबातील व्यक्तीला त्याच्या डोक्यावरील शेंडीमुळे वैवाहीक आयुष्यात कलहाचा सामना करावा लागला. कुटुंबातील वाद इतका वाढला की, आता पती-पत्नी वेगळे होण्याच्या मार्गावर आहेत. फॅमिली कोट्रात दाखल केलेल्या तक्रारीत पत्नी म्हणाली की, पतीने डोक्यावर शेंडी ठेवल्यामुळे गाऊंढळ दिसतो. त्याच्यामुळे माझ्या माहेरचे माझा मजाक उडवतात, यामुळे मला खूप अपमानजनक वाटते. पण पतीचे म्हणने आहे की, त्याने नवस ठेवला आहे, ही शेंडी त्याच्या मृत्यूनंतरच जाईल.


  काउसंलिंगमध्ये शेंडीमुळे वाद झाल्याचे समोर आले

  प्रकरणाला फॅमिली कोर्टाने काउंसलिंगसाठी ठेवले आहे. अरेरा कॉलोनीतील एका महिलेने लग्नाच्या तीन वर्षांनंतर घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. यावेळी कोर्टाला कळाले की, त्यांच्यातील वादाचे कारण पतीने ठेवलेली शेंडी आहे. पत्नीचे म्हणने आहे की, शेंडी ठेवल्यामुळे पती गाऊंढळ दिसतो. तिच्या स्टँडर्डचे नाहीये. पती एक्जीक्यूटिव इंजीनिअर आहे तर पत्नी एमबीए पास आहे.


  तीन वर्षांपूर्वी झाले होते लग्न
  काउंसलर सरिता राजानीने सांगितले की, त्यांचे लग्न 2 फेब्रुवारी 2016 ला झाले होते. पहिल्या वर्षी सगळे काही सुरळीत होते. दोन वर्षानंतर त्या व्यक्तीच्या आई वडिलांचा एका अपघातात मृत्यू झाला. मृत्यूच्या कर्मकांडावेळी पतीचे मुंडण केले गेले. त्यानंतर धार्मिक मान्यतेनुसार पतीने शेंडी ठेवली. यानंतर आयुष्य हळुहळू सुरळीत सुरू होते, पण पतीने शेंडी कापली नाही म्हणून पत्नीने त्याला बोलने सुरू केले. पत्नीने सांगितले की, पतीने शेंडी ठेवल्यामुळे सगळे त्यांना पंडीतजी म्हणून हाक मारायचे आणि त्यामुळे पत्नीला अपमानजनक वाटायचे.


  पतीलाच हट्ट, घटस्फोट घेईल पण शेंडी कापणार नाही
  महिला म्हणाली की, पतीने ठरवले आहे, कधीच शेंडी कापणार नाही. त्यांची शेंडी त्यांच्या मृत्यूनंतरच जाईल. तर पती म्हणाला, पत्नीला सगळ्या सुख सोयी आहेत, पण ती त्याच्या शेंडीच्या मागे आहे. या वादामुळे पत्नी 6 महिन्यांपासून माहेरी गेली आहे. पतीचे म्हणने आहे की, शेंडीसोबत स्विकार कर किंवा घटस्फोट दे. सध्या त्यांच्यात काउंसलिंगच्या माध्यामातून वाद मिटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Trending