आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी नांदायला येत नाही..या रागातून पतीने कापले पत्नीचे नाक, कापलेले नाक घेऊन फरार झाला आरोपी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पत्नी नांदायला येत नाही, याचा राग येऊन पतीने तिचे नाक आणि ओठ कापल्याची धक्कादायक घटना सांगलीजवळच्या कागवाड (कर्नाटक) येथे घेडली आहे. आरोपी पत्नीला घ्यायला आला होता. परंतु पत्नीने येण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे त्याने पत्नीवर चाकूने वार केला. तिचे नाक आणि ओठ कापले. या हल्ल्यामुळे सुनीता नाईक ही गंभीर जखमी झाली आहे.

 

रक्ताच्या थारोल्यात पडलेल्या सुनीताला कुटुंबीयांनी तात्काळ मिरज (जि.सांगली) येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सुरेश नाईक असे आरोपीचे नाव असून कापलेले नाक तो सोबत घेऊन पसार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

 

काय आहे प्रकरण?

आरोपी सुरेश नाईक याला दारुचे वेसन आहे. तो पत्नीला मारहाणीही करत होता. पतीच्या जाचाला कंटाळून महिला महिनाभरापासून माहेरी (कागवाड) आली होती. गेल्या रविवारी (ता.6) आरोपी सुरेश हा कागवाड येथे आला होता. तेव्हा तो दारुच्या नशेत होता. त्याने पत्नीला सोबत येण्यास सांगितले. मात्र, तिने सोबत येण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावर त्याने पत्नीला शिविगाळ केली. एवढेच नाही तर तिला तो मारहाण करायला लागला. सुरेशने पत्नीवर चाकूने वार केले. रागाच्या भरात पतीने पत्नीचे नाक आणि ओठ कापले. त्यानंतर कापलेले नाक घेऊन तो पसार झाला.

 

बातम्या आणखी आहेत...