आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एंटरटेन्मेंट डेस्कः कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या जीवनावर एक वेब शो बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. आतापर्यंत दाऊदवर अनेक चित्रपट आणि माहितीपट आले आहेत. मात्र या शोची निर्मिती अमेझॉन प्राइम इंडिया मोठ्या प्रमाणात करत आहे. हुसेन झैदी यांची कादंबरी 'डोंगरी टू दुबई'वर शो आधारित असेल. यात दाऊदचा जीवनपट दाखवण्यात येईल. डोंगरीच्या वस्तीत राहणारा एक माणूस कसा भारताचा कुख्यात गुन्हेगार झाला हे यात दाखवले जाईल. यात त्याचे वडील शेख इब्राहिम अली कासकर याच्या नजरेतून ही मालिका दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. एका प्रकारे या वेबशोमधून त्याची गाैरवगाथा दाखवण्यात येणार आहे, यामुळे वाद उद्भवूू शकतो.
शोची कमान दिग्दर्शक रेन्सिल डिसिल्वाच्या हातात आहे. पण अमेझॉन प्राइमने सर्वांचे हात बांधले आहेत. कोणालाही शाेबद्दल काहीही सांगण्याची परवानगी नाही. म्हणूनच, रेन्सिलने शोच्या कथानक आणि गौरवगाथेविषयी विचारल्यास प्रतिसाद दिला नाही.
शोच्या लेखन टीममध्ये काम करणाऱ्या सूत्रांनी कथेला कोणता अँगल दिला आहे ते सांगितले. तो म्हणाला, या कथेत दाऊदच्या त्या काळातील आर्थिक परिस्थितीवर एक भाग तयार करण्यात आला आहे. त्याचे वडील इब्राहिम कासकर यांची मन:स्थिती आणि विचारावर एक पूर्ण भाग बनवण्यात आला आहे. आतापर्यंत केके मेननची या शोसाठी निवड झाली आहे, जो बहुधा या शोमध्ये इब्राहिमच्या भूमिकेत दिसणार आहे. दाऊदसाठी एक नवीन चेहरा शोधला जात आहे.
याचे शूटिंग जानेवारीमध्ये सुरू होणार आहे. सध्या कलाकारंाची निवड आणि लोकेशनचा शोध घेतला जात आहे.
या शोमध्ये 1960 ते 1993 पर्यंतचा प्रवास दाखवला जाईल. त्यामुळे विशेष करून मुंबईतील डोंगरी, फोटे, मशीद बांद्रा रोड, बोरा बाजारसारख्या लोकेशनचा सेट उभारला जाईल.
सूत्रानुसार, शोचे बजेट जास्त ठेवण्यात आले आहे. अॅमेझॉन याला मोठ्या प्रमाणात बनवणार आहे. यासाठी 'इनसाइड ऐज' आणि 'मिर्झापूर'पेक्षा जास्त बजेट ठेवण्यात आले.
ट्रेड विश्लेषकांच्या मते, सध्या डिजिटल प्लॅटफॉर्म्ससाठी वादग्रस्त प्रतिमा असणाऱ्या लोकांना शोधून त्यांच्यावर वेब शो बनवले जात आहेत. यात काही वादग्रस्त आध्यात्मिक गुरुंचादेखील समावेश आहे. शकुन बत्रादेखील लवकरच रजनीश ओशोवर यांच्यावर एक प्रोजेक्ट घेऊन येणार आहेत. ते याची लवकरच घोषणा करणार आहेत. याशिवाय बाबा राम रहीम आणि अासाराम बापू यांच्यावर डिजिटल माध्यमे नजर लावून बसली आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.