आयपीएल : हैदराबाद अव्वल स्थानावर; दिल्ली संघाचा तिसरा पराभव

वृत्तसंस्था

Apr 05,2019 09:01:00 AM IST
दिल्ली - भुवनेश्वर कुमारच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबाद संघाने गुरुवारी १२ व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेत शानदार तिसऱ्या विजयाची नाेंद केली. हैदराबाद संघाने आपल्या चाैथ्या सामन्यात यजमान दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. हैदराबादने १८.३ षटकांत ५ गड्यांनी सामना जिंकला. जाॅनी बैयरस्ट्राे (४८), विजय शंकर (१६), नबी (नाबाद १७) यांनी झटपट विजय निश्चित केला.
दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १२९ धावा काढल्या. प्रत्युत्तरात हैदराबाद संघाने पाच गडी गमावून सामना जिंकला. हा हैदराबाद संघाचा चार सामन्यांतील तिसरा विजय ठरला. या विजयाच्या बळावर हैदराबादने गुणतालिकेत अव्वल स्थानावर धडक मारली. तीन विजयांसह हैदराबादच्या नावे ६ गुणांची नाेंद झाली आहे, तर दिल्लीचा हा तिसरा पराभव ठरला.
X
COMMENT