आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 2019 : हैदराबाद टीमचा पहिला विजय, संजू सॅमसन यंंदा सत्रात पहिला शतकवीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


हैदराबाद- डेव्हिड वॉर्नरपाठोपाठ (६९) युसूफ पठाण (नाबाद १६) आणि रशीद खानच्या ( नाबाद १५) झंझावाती खेळीच्या बळावर यजमान सनरायझर्स हैदराबादचा संघ घरच्या मैदानावर विजयी झाला. हैदराबादने शुक्रवारी १२ व्या सत्राच्या आयपीएलमध्ये रहाणेच्या राजस्थान रॉयल्सवर ५ गड्यांनी मात केली. हैदराबादचा हा लीगमधील पहिला विजय ठरला. 


राजस्थान रॉयल्सला आपला सलग दुसरा पराभव टाळता आला नाही. संजू सॅमसन (१०२) आणि रहाणेच्या (७०) शानदार खेळीच्या आधारे राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २ बाद १९८ धावा काढल्या. प्रत्युत्तरामध्ये हैदराबादने १९ षटकांत ५ गडी गमावून लक्ष्य गाठले. 

 

आता राजस्थान रॉयल्स संघाचा स्पर्धेतील तिसरा सामना उद्या गत चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज टीमशी होईल. तसेच यजमान सनरायझर्स हैदराबादला उद्या रविवारी आपल्या घरच्या मैदानावर कोहलीच्या रॉयल चॅलेंज बंगळुरूच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. हे दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी या सामन्यात झंुजणार आहेत. 

 

सॅमसन खणखणला :  राजस्थान रॉयल्स संघाचा युवा फलंदाज संजू सॅमसन शुक्रवारी यजमान हैदराबादविरुद्ध  खणखणला. त्याने झंझावाती खेळीच्या  बळावर यंदा सत्रात पहिला शतकवीर होण्याचा बहुमान पटकावला. त्याने ५५ चेंडूंत १० चाैकार व ४ षटकारांसह नाबाद १०२ धावा काढल्या. 

बातम्या आणखी आहेत...