Home | Sports | From The Field | Hyderabad defeated Punjab by 45 runs

डेव्हिड वाॅर्नरचे पंजाबविरुद्ध सलग आठवे अर्धशतक; हैदराबाद टीमचा विजयी षटकार

वृत्तसंस्था | Update - Apr 30, 2019, 09:18 AM IST

राशिद खान आणि खलील अहमदच्या प्रत्येकी तीन विकेट

  • Hyderabad defeated Punjab by 45 runs

    हैदराबाद - जबरदस्त फाॅर्मात असलेल्या डेव्हिड वॉ्नरच्या (८१) झंझावातापाठाेपाठ राशिद खान आणि खलील अहमदच्या (प्रत्येकी ३ बळी) धारदार गाेलंदाजीच्या बळावर सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलमध्ये विजयाचा षटकार मारला. यजमान हैदराबाद संघाने आपल्या घरच्या मैदानावर साेमवारी पाहुण्या किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव केला. हैदराबाद संघाने ४५ धावांनी सामना जिंकला. हैदराबाद संघाचा यंदाच्या लीगमधील हा सहावा विजय ठरला. तसेच किंग्ज इलेव्हन पंजाबला सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.


    प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने आपल्या घरच्या मैदानावर पंजाबच्या किंग्जसमाेर विजयासाठी खडतर २१३ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युुत्तरात पंजाबला अवघ्या १६१ धावांपर्यंत मजल मारता आली. दरम्यान, लाेकेशने एकाकी झुंज देताना ७९ धावांची खेळी केली. मात्र, त्याला आपल्या टीमचा पराभव टाळता आला नाही. इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले.


    वॉर्नरचा झंझावात : हैदराबाद संघाकडून डेव्हिड वॉ्नरने झंझावाती खेळी केली. त्याने ५६ चेंडूंमध्ये ८१ धावंची खेळी केली. यासह त्याने पंजाबविरुद्ध शानदार सलग आठवे अर्धशतक साजरे केले. सध्या यंदाच्या सत्रामध्ये वॉ्नर हा टाॅप स्काेअरर आहे. त्याने सलगच्या झंझावाती खेळीच्या बळावर यंदाचे सत्र गाजवले आहे.

Trending