आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रीम कोर्ट म्हणाले - लोकांना सत्य जाणून घेण्याचा अधिकार; तीन सदस्यीय चौकशी आयोग 6 महिन्यांत देणार अहवाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हैदराबाद बलात्कार आणि हत्याकांडातील 4 आरोपी 6 डिसेंबर रोजी एन्काउंटरमध्ये मारले गेले
  • सरन्यायाधीश म्हणाले - आमच्या पुढील आदेशापर्यंत इतर न्यायालय किंवा प्राधिकरण या प्रकरणाची चौकशी करणार नाही

नवी दिल्ली - हैदराबाद बलात्कार आणि हत्याकांडातील चार आरोपींच्या एन्काउंटरबाबत दाखल केलेल्या याचिकांवर गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने या चकमकीचा निःपक्षपाती तपास करण्यासाठी माजी न्यायाधीश व्ही.एस. सिरपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय कमिशनची स्थापना केली आहे. हे कमिशन 6 महिन्यांत तपास पूर्ण करून अहवाल सादर करणार आहे.


सरन्यायाधीश एस ए बोबडे यांनी सांगितले की, नागरिकांना एन्काउंटरचे सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. आमच्या पुढील आदेशापर्यंत कोणतेही न्यायालय किंवा प्राधिकरण या प्रकरणाची चौकशी करणार नाही. 
सुनावणी दरम्यान वकील मुकुल रोहतगी यांनी तेलंगाना सरकारकडून बाजू मांडली. त्यांनी कोर्टात सांगितले की, निःपक्षपाती तपास करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. यामुळे सुप्रीम कोर्टाला इतर कोणत्याही कमिशनची स्थापना करण्याची आवश्यकता नाही. एकाचवेळी दोन चौकशी समितीमुळे प्रकरणात गोंधळ निर्माण होईल. यावर सरन्यायाधीश म्हणाले की, आम्ही कोणाला दोषी मानत नाहीत. चौकशी आदेश जारी करणार आहोत आणि तुम्हाला यामध्ये सहभावा व्हावे लागेल. रोहतगी म्हणाले की, उच्च न्यायालय आणि मानवाधिकार आयोग या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 


चौकशीसाठी एसआयटी गठित, 13 डिसेंबरपर्यंत मृतदेह सुरक्षित ठेवण
ार


दुसरीकडे तेलंगाना उच्च न्यायालयाने गेल्या सोमवारी याचिकेवर सुनावणी करत सर्व आरोपींचे मृतदेह 13 डिसेंबरपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, पोलिसांनी या एन्काउंटरसाठी जारी केलेल्या निर्देशांचे पालन केले का नाही असा सवाल उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर एस चौहान यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने होता. यासोबतच पोस्टमॉर्टम संबंधातली व्हिहिओची सीडी किंवा पेनड्राइव महबूबनगरच्या मुख्य जिल्हा न्यायाधीशांकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले होते.  

 

एसआयटीमध्ये वेगवेगळ्या शहरातील अधिकाऱ्यांचा समावेश 


तेलंगाना सरकारने एन्काउंटरच्या चौकशीसाठी 8 सदस्यीय एसआयटी स्थापन केली आहे. राचकोंडाचे पोलिस कमिश्नर महेश एम भागवत याचे प्रमुख आहेत. एसआयटीमध्य एका महिलेसह राज्यातील विभिन्न भागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बातम्या आणखी आहेत...