आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hyderabad Filmmaker Chinni Kumar Accuses Nagaraj Manjule's Film 'Zund' Of Copyright Infringement

नागराज मंजुळेचा चित्रपट 'झुंड' वर हैदराबादचे फिल्म मेकर चिन्नी कुमारने केला कॉपीराइट उल्लंघन केल्याचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : हैदराबादचे फिल्म मेकर नंदी चिन्नी कुमारने अमिताभ बच्चन यांचा चित्रपट 'झुंड' च्या मेकर्सला लीगल नोटिस पाठवली आहे. नंदी यांचे म्हणणे आहे की, मेकर्सने कॉपीराइटचे उल्लंघन केले आहे. या वादामध्ये स्लम सॉकरचे फाउंडर विजय बरसे यांचेही नाव सामील आहे. ज्यांच्या आयुष्यावर हा चित्रपट बनवला जात आहे.  


आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत नंदीने सांगितले की, नोटिसचे उत्तर केवळ टी-सीरीजनेच पाठवले पण ते खूप अस्पष्ट आहे. नंदीने हा आरोपदेखील केला की, चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांना फसवले आणि धमकी दिली. कुमारने चित्रपटगृहे, टेलिव्हिजन आणि सर्व डिजीटल प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचे स्क्रीनिंग रोखण्यासाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.  


चिन्नी यांच्यानुसार, 2017 मध्ये त्यांनी अखिलेश पटेलच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याचे राइट्स खरेदी केले होते. अखिलेश स्लम सॉकर प्लेयर आहे, जो होमलेस वर्ल्डकपमध्ये भारतीय टीमचा कॅप्टन होता. कुमार, अखिलेशच्या आयुष्यावर स्लम सॉकर नावाने चित्रपट लिहिणार होता आणि दिग्दर्शितदेखील करणार होता. अखिलेश नागपुरच्या एका झोपडपट्टीमध्ये जन्माला होता आणि ड्रग्सचा शिकार झाला होता. फुटबॉलसाठीच्या त्याच्या वेडाने अखिलेशचे आयुष्यच बदलले.  


फिल्ममेकर नंदीचे म्हणणे आहे की, त्याने तेलंगाना सिनेमा रायटर्स असोसिएशनमध्ये 11 जून 2018 ला चित्रपटाची कथा रजिस्टर केली होती. 'सैराट' चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी विजय बरसेच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याचे अधिकार खरेदी केले होते. विजय, अखिलेशचा कोच होता. 'झुंड'मध्ये अखिलेशचाही मोठा रोल दाखवला जाणार आहे. त्यामुळे त्याने कॉपीराइटचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.  


नंदीनुसार, नागराजने अखिलेश पॉलकडून 4 लाख रुपयांमध्ये अधिकार खरेदी केल्याचा दावा केला होता, पण कागदपत्रे दाखवण्यास नकार दिला होता. एवढेच नाही तर अखिलेशने त्याला अधिकार विकण्यास नकार दिला होता. नागराजने माझा अपमान केला आणि कागदपत्रे न दाखवता सॉर्ट करण्यास येण्यासाठी लाचार केले. 


चिन्नीने इंडिया मुव्ही पिक्चर्स असोसिएशन आणि तेलंगणा सिनेमा रायटर्स असोसिएशनकडे मागणी केली आहे की, त्यांनी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडून 'झुंड' ला सेंसर सर्टिफिकेट मिळू देऊ नये. 

बातम्या आणखी आहेत...