Home | National | Other State | Hyderabad Girl Stripped, Cut With Blade, Filmed By Drug Addict

हैदराबादः अल्पवयीन मुलीचे कपडे काढले, ब्लेडने केले वार, व्हिडिओ देखील बनवला; किंचाळणे ऐकून स्थानिकांनी नराधमाला पकडले

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 09, 2019, 02:26 PM IST

स्थानिकांनी नराधमाला पकडले तेव्हा तो नशेत तर्र होता

 • Hyderabad Girl Stripped, Cut With Blade, Filmed By Drug Addict

  हैदराबाद - येथे अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यसनी नराधमाने अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार केला. तिचे किंचाळणे ऐकून स्थानिकांनी तिला वाचवले आणि आरोपीला पोलिसांच्या हवाली केले. पोलिस रिपोर्टनुसार, अमली पदार्थांचा आहारी असलेल्या 19 वर्षीय आरोपीने आधी अल्पवयीन मुलीचे कपडे फाडून तिच्यावर अत्याचार केला. तसेच तिला ठार मारण्यासाठी ब्लेडने असंख्य वार केले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ देखील बनवला. स्थानिकांनी नराधमाला पकडले तेव्हा तो नशेत तर्र होता. यानंतर रक्तरंजित आणि गंभीर जखमी अवस्थेत पीडितेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.


  अशा अवस्थेत सापडली मुलगी...
  ही घटना हैदराबादच्या गांधीनगर परिसरात गुरुवारी घडली आहे. या घटनेचा खुलासा पीडित मुलीच्या ओरडण्यानंतर झाला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना या परिसरात एका मुलीच्या ओरड्याचे आवाज येत होते. त्यांनी रिकाम्या ठिकाणी जाऊन पाहिले तेव्हा 16 वर्षांची मुलगी रक्तरंजित अवस्थेत होती आणि तिच्या शरीरावर एकही कपडा नव्हता. तिच्या बाजूलाच 19 वर्षांचा नराधम नशेत तर्र अवस्थेत तिचा व्हिडिओ बनवत होता. स्थानिकांनी त्याच्या तावडीतून मुलीची सुटका केली आणि तिच्या शरीर झाकले. यानंतर मुलीला रुग्णालयात रवाना करून नराधमाला पोलिसांच्या हवाली केले.


  काय आहे प्रकरण?
  पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी अमली पदार्थांचा व्यसनी होता. तसेच गेल्या काही महिन्यांपासून पीडित मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. या दरम्यान त्याने मुलीवर बळजबरी करून तिच्यावर बलात्कार केला. तसेच या कृत्याचा व्हिडिओ तयार करून तिला वेळोवेळी संबंध ठेवण्यासाठी मजबूर केले. घटनेच्या दिवशी सुद्धा त्याने मुलीला तेच व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याची धमकी देऊन एका रिकाम्या फ्लॅटवर बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केला. हैदराबादच्या गांधी नगर परिसरात मोठ्या संख्येने विद्यार्थी राहतात. या ठिकाणी अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांकडून यापूर्वीही अनेक गुन्ह्यांची नोंद झाली आहे.


  पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
  स्थानिकांनी आरोपीला पोलिसांच्या हवाली केल्यानंतर पीडितेचे वडीलही पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. त्यांनी सुरुवातीला आरोपीवर अपहरणाचा खटला दाखल केला. यानंतर विनयभंग, बलात्कार, अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि पोक्सोसह आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल केले.

Trending