आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 वर्षांत चोरल्या 500 महागड्या Car; दिल्लीत चोरी इतर राज्यांत विक्री, 50 KM पाठलाग करून अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी सफ्रुद्दीन नावाच्या व्यक्तीचा 50 किमी पर्यंत पाठलाग करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सफरुद्दीनने गेल्या 5 वर्षांत तब्बल 500 महागड्या कार चोरल्या आहेत. दिल्लीत चोरी केलेली कार पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशसह इतर राज्यांमध्ये विकणे त्याचा धंदा बनला होता. हायटेक गॅजेट, लॅपटॉप आणि हॅकिंग सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तो महागड्या गाड्यांचे सेंट्रल लॉकिंग सिस्टिम फेल करायचा. त्याची एक गँग असून त्यापैकी एक पोलिस एन्काउंटरमध्ये ठार मारला गेला आहे. 


डोक्यावर 1 लाखांचे बक्षीस
मूळचा हैदराबादचा असलेला सफ्रुद्दीन महागड्या कार चोरण्यासाठी विमानाने दिल्लीत येत होते. दिल्लीत लॅपटॉप आणि गॅजेट्सच्या माध्यमातून तो कारचे सॉफ्टवेअर आणि सेंट्रल लॉकिंग सिस्टिम हॅक करायचा. गेल्या 5 वर्षांत त्याने असे करून दरवर्षी सरासरी 100 महागड्या कार चोरल्या आहेत. पोलिसांनी त्याच्या डोक्यावर 1 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. पोलिसांनी त्याला अनेकवेळा पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो दिल्लीत महागड्या कार चोरून वेळीच हैदराबादला निघून जात होता. अशी माहिती दिल्लीचे पोलिस उपायुक्त राजेश देव यांनी दिली. त्याला दिल्लीत 3 ऑगस्ट रोजी पाठलाग करून अटक करण्यात आली. यानंतर सफ्रुद्दीनने आपला गुन्हा कबूल केला आहे. 5 जून रोजी दिल्ली पोलिसांनी त्याच्या सहकाऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला होता. पोलिसांच्या प्रत्युत्तरात टोळीचा एक सदस्य नूर मोहम्मद ठार झाला. तर पोलिसांनी त्याचा दुसरा सहकारी रवी कुलदीपला अटक केली.

बातम्या आणखी आहेत...