आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निजामाच्या 308 कोटी रूपयांसाठी भारत-पाक मध्ये सुरु आहे वाद, 72 वर्षांनी लागणार खटल्याचा निकाल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हैद्राबादच्या निजामाच्या 308 कोटी रुपयांवरील मालकी हक्कासाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये वाद सुरु आहे. गेल्या 72 वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये हा वाद सुरु आहे. हैद्राबादचा तत्कालीन निजाम उस्मान अली खान याने 1948 मध्ये पाकिस्तानचे ब्रिटनमधील उच्चायुक्त राहिलेले हबीब इब्राहिम रहीमटोला यांच्या लंडन येथील एका बँकेत 308 कोटी रूपये जमा केले होते. या रकमेवर भारत आणि पाकिस्तान दोघेही आपला हक्क गाजवत आहेत.  


भारताच्या बाजूने लागू शकतो निकाल
आता या प्रकरणाचा निकाल भारताच्या बाजूने लागण्याची आशा आहे. कारण लंडनच्या बँकेतील जमा रकमेबाबत हैद्राबादचे आठवे निजाम प्रिंस मुकर्रम जेह आणि त्यांचा धाकटा भाऊ मुफाखाम जेह यांनी पाक सरकार विरोधात लढण्यात येणाऱ्या कायदेशीर लढाईत भारताशी हात मिळवणी केली आहे. या प्रकरणाबाबत पुढील सहा आठवड्यांत निकाल लागण्याची शक्यता आहे. त्या पैशांवर आमचा अधिकार असल्याचा दावा निजामाच्या वंशजांनी केला आहे. जस्टिस मार्कस स्मिथ यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. 
 
 
हैद्राबादचे शेवटचे निजाम ओस्मान अली खान यांचे स्वातंत्र्यानंतर भारत किंवा पाकिस्तानकडे जाण्याबाबत संभ्रमात होते. अशात त्यांनी आपले धन लंडन स्थित बँकेत जमा केले आणि निजाम ज्या देशात सहभागी होतील त्या देशाचा संपत्तीवर मालकी हक्क असेल असे निश्चित झाले. निजामाच्या मृत्यूनंतर भारताने पैसांची मागणी केली असता निजामाने फंडच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानचे हाय कमिशनर हबीब रहमतुल्ला यांच्याकडे पैसे जमा केल्याचे नेटवेस्ट बँकेने सांगतिले. तेव्हापासून या पैशांच्या मालकी हक्कासाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये वाद सुरु आहे.  

बातम्या आणखी आहेत...