आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hyderabad Rape Case : Father Of The Woman Veterinarian Says, The Culprits Must Be Punished As Soon As Possible

पीडितेचे वडील म्हणाले - कायदे तयार केले पण अंमलबजावणी झाली नाही, निर्भया प्रकरणच पाहा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - पशुवैद्यकीय डॉक्टरवरील बलात्कारानंतर संसदेपासून ते रस्त्यापर्यंत कठोर कायदा करण्याची मागणी होत आहे. यादरम्यान डॉक्टरचे वडिलांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, कठोर कायदे केले गेले, परंतु त्यावर अंमलबजावणी झाली नाही. निर्भया प्रकरण हे समोरचे उदाहरण असल्याचे ते म्हणाले. दरम्यान प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी मागणी केली आहे.


या प्रकरणाचे संसदेतही पडसाद उमटले होते. खासदार म्हणाले की, अत्याचार करणाऱ्यांचा जनतेने न्याय करावा आणि दोषींना नपुंसक बनवावे. पोलिसांनी कोर्टाकडे या आरोपींची 10 दिवसांची कोठडी मागितली 


हैदराबादमध्ये 27 नोव्हेंबर रोजी दुचाकीचे चाक पंक्चर झाल्यानंतर एका टोलनाक्यावर मदतीची वाट पाहत असलेल्या 26 वर्षीय पशुवैद्यकीय डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरचा जळालेला मृतदेह आढळला. याप्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी कोर्टाकडे या आरोपींची 10 दिवसांची कोठडी मागतली आहे. याप्रकरणी शादनगर कोर्ट बुधवारी सुनावणी करणार आहे.