आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hyderabad Rape Case : Outrage From Parliament,, Ready To Strict The Law Even More Rajnath Singh

संसदेत आली सूचना : अत्याचाऱ्यांना नपुंसक करा, लोकांच्या ताब्यात द्या, लोकसभेत राजनाथ म्हणाले - कायदा आणखी कठोर करण्यास तयार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हेटरनरी डॉक्टरवर झालेल्या अत्याचारप्रकरणी सोमवारीही दिल्ली, तेलगण, तामिळनाडू, मध्य प्रदेशसह देशाच्या विविध भागांत निदर्शने झाली - Divya Marathi
व्हेटरनरी डॉक्टरवर झालेल्या अत्याचारप्रकरणी सोमवारीही दिल्ली, तेलगण, तामिळनाडू, मध्य प्रदेशसह देशाच्या विविध भागांत निदर्शने झाली

दिल्ली - हैदराबादेत एका महिला व्हेटरनरी डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळल्याप्रकरणी सोमवारी संसदेत तीव्र पडसाद उमटले. राज्यसभेत संतप्त सदस्यांनी आरोपींना तत्काळ फाशी देण्याची, जमावाच्या ताब्यात देऊन लिंचिंग आणि नपुंसक करण्याची मागणी केली. आरोपींना विशिष्ट मुदतीत शिक्षा देण्याची मागणीही झाली. तर बलात्कारासारखे गुन्हे करणाऱ्यांना फक्त फाशीची शिक्षाच हवी, अशी एकसुरी मागणी लोकसभेतील खासदारांनी केली. ३० दिवसांच्या आत याची सुनावणी पूर्ण होऊन आरोपींना शिक्षेचा निर्णय व्हायला हवा, असेही खासदारांनी म्हटले. खासदारांनी दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा उल्लेख करत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही आरोपींना अद्याप फाशी झाली नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, चर्चेनंतर सरकार या मुद्द्याबाबत आणखी कडक कायदे करण्यास तयार आहे.  केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले की, हैदराबादसारख्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात लवकर शिक्षा मिळण्यासाठी सरकार आयपीसी, सीआरपीसी कायद्यात दुरुस्ती करण्यास तयार आहे. 

‘गुन्हेगारांची नावे सार्वजनिक करा’कायद्याची भीती नाही, जमावाने न्याय द्यावा

कठोर कायद्याचीही भीती राहिलेली नाही. मला वाटते की, अशा प्रकरणातील आरोपींना जमावाच्या ताब्यात देऊन लिंचिंग केले पाहिजे. जगातील अनेक देशांत अशी पद्धत आहे’
- जया बच्चन, सपा

तुरुंगातून सुटण्याआधी नपुंसक करावे

त्यांनी पुन्हा गुन्हा करू नये यासाठीअत्याचाऱ्यांची सुटका करण्याआधी त्यांना नपुंसक बनवावे. लैंगिक छळ गुन्ह्यांतील गुन्हेगारांची नावे जाहीर करावी.’
- पी. विल्सन, द्रमुक

जागीच शिक्षा देण्याची व्यवस्था तयार करावी
 
अशा निर्घृण घटना देशात खराब वातावरण तयार करतात. आपल्याला जागीच शिक्षा देण्याची व्यवस्था तयार करावी लागेल.कशी प्रतिक्रिया द्यायला हवी यावर  चर्चा करायला हवी.’
- बी. संजय कुमार, भाजप

तेलंगणात विकत असलेली दारूही आहे जबाबदार

हैदराबादची घटना अमानवी आहे. तेलंगणातील  दारू विक्रीही या घटनेसाठी जबाबदार आहे. कोर्टाने त्वरित निकाल देऊन दोषींना फाशी द्यावी’.
- उत्तम कुमार रेड्डी, काँग्रेस
 

अशा गुन्हेगारांना दया याचिकेचा हक्क असावा का? : उपराष्ट्रपती नायडू


फास्ट ट्रॅक कोर्टातून शिक्षा मिळते, तर अपिलामुळे गुन्हेगार वाचतो. अशा गुन्हेगारांना दया याचिकेचा हक्क असावा का, हेही आता निश्चित करावे लागेल. - एम. व्यंकय्या नायडूराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची चिंता :


राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने देशात लैंगिक शोषणाच्या घटनांवर चिंता व्यक्त करताना केंद्र, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांना नोटीस जारी केली आहे. अायाेगाने अशा प्रकरणांच्या निपटाऱ्याची प्रक्रिया आणि निर्भया निधीच्या वापरावरील अहवाल मागवला आहे.व्हेटरनरी डॉक्टरला ठार केल्यानंतरही अनेकदा केला अत्याचार,  पोलिस रिपोर्टमध्ये खुलास

व्हेटरनरी डॉक्टरचे अपहरण केल्यावर ४ आरोपींनी निर्मनुष्य ठिकाणी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. नंतर गळा दाबून तिची हत्या केली. डोक्यावर जोरदार प्रहार केला. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. नंतर आरोपींनी तिचे शव ट्रकच्या केबिनमध्ये ठेवले. ते फेकण्यासाठी २७ किमी दूर घेऊन गेले. रस्त्यात धावत्या ट्रकमध्ये अनेकदा अत्याचार केला. विशेष म्हणजे केबिनमध्ये ठेवण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी ही माहिती कोर्टाला आरोपींची १० दिवसांची कोठडी मागताना दिली. आरोपी सध्या कोठडीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...