आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबाद एन्काउंटरचे हिरो कमिश्नर सज्जनार; 11 वर्षांपूर्वी यांच्याच नेतृत्वात मारले गेले 3 अॅसिड हल्लोखार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेलंगणामध्ये पोलिस आयुक्त सज्जनार एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत. - Divya Marathi
तेलंगणामध्ये पोलिस आयुक्त सज्जनार एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत.

हैदराबाद - तेलंगणाच्या निर्भयाच्या आरोपींचा पोलिसांची शस्त्रे हिसकावून पळून जात असताना एन्काउंटर करण्यात आला. देशभर कौतुकांचा वर्षाव होत असलेल्या हैदराबाद पोलिसांच्या या कारवाईचे नेतृत्व सायबराबाद (सिंकदराबाद-हैदराबाद पोलिस) पोलिस आयुक्त सीव्ही सज्जनार यांनी केले. पोलिसांची एक टीम तपासाचा भाग म्हणून घटनेचे रिक्रिएशन करण्यासाठी आरोपींना घटनास्थळी घेऊन गेली होती. याच दरम्यान आरोपींनी पोलिसांची शस्त्रे हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या माहितीनुसार, याच दरम्यान क्रॉसफायरिंग झाली आणि बलात्काराचे चारही आरोपी ठार झाले. तेलंगणामध्ये सज्जनार एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत. तेलंगणात 11 वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने 3 अॅसिड हल्लेखोरांचा मृत्यू झाला होता. योगा-योगाने त्या पोलिस टीमचे नेतृत्व सुद्धा सज्जनार करत होते.

युवकांचे हिरो आहेत सज्जनार

पोलिस आयुक्त सज्जनार हैदराबाद आणि तेलंगणामध्ये युवकांचे नायक मानले जातात. 2008 मध्ये ते वारंगल जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक होते. त्यावेळी एक आरोपी एस श्रीनिवास राव याने आपल्या दोन मित्रांना सोबत घेऊन अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीवर अॅसिड फेकले होते. तिने एकतर्फी प्रेमाचा प्रस्ताव फेटाळल्याने श्रीनिवासने संतापात हा गुन्हा केला होता. या घटनेनंतर शहरात नागरिकांनी पोलिसांच्या विरोधात रोष व्यक्त केला होता. अनेक विद्यार्थी संघटना रस्त्यांवर उतरल्या होत्या. त्यावेळी सज्जनार यांच्या नेतृत्वातील टीमने तिन्ही आरोपींना अटक केली. परंतु, काही तासांतच त्यांचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले.

तेव्हापासूनच सज्जनार विद्यार्थ्यांचे हिरो मानले जातात. अॅसिड हल्लेखोरांच्या एन्काउंटरनंतर पीडितेच्या महाविद्यालातील शेकडो विद्यार्थिनींनी सज्जनार यांची भेट घेतली होती. तसेच त्यांना हार आणि फुले भेट देऊन त्यांचा सत्कार केला होता. महाविद्यालयात एन्काउंटर सेलिब्रेट करण्यासाठी मिठाईचे वाटप देखील करण्यात आले होते. तसेच ठिक-ठिकाणी पोलिस जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. तशाच प्रकारच्या घोषणा आज हैदराबाद बलात्काऱ्यांच्या एनकाउंटरनंतरही दिल्या जात आहेत.

2008 मध्ये घडले होते असे काही...


2008 च्या वारंगल अॅसिड हल्ल्याचा तपास करताना पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. त्यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, तपासाचा भाग म्हणून अॅसिड हल्ल्यातील आरोपींना घटनास्थळी नेण्यात आले. या ठिकाणी त्यांना विविध प्रकारची प्रश्ने विचारून चौकशी केली जात होती. याच दरम्यान आरोपींनी घटनास्थळावरील पोलिसांचे शस्त्र हिसकावण्याचा प्रयत्न केला, क्रॉसफायरिंग झाली आणि तिन्ही आरोपींचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. मानवाधिकार संघटना अजुनही या घटनेला पूर्वनियोजित कट मानतात.

बातम्या आणखी आहेत...