आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

62 वर्षांच्या पतीने 29 वर्षीय पत्नीला WhatsApp वर दिला तलाक, महिलेने सुषमा स्वराज यांनी मागितली मदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - येथील एका पतीने आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या पत्नीला व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून तलाक दिला आहे. यानंतर पीडित महिलेने न्याय मिळवण्यासाठी परराष्ट्र मंत्री सुषणा स्वराज यांना मदतीचे आवाहन केले आहे. व्हॉट्सअॅपवर तलाकचा मेसेज पाठवणाऱ्या आपल्या पतीशी महिलेने संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, तो बोलण्यासही तयार नाही. त्याने आपल्या या घटस्फोटाचे कारण सुद्धा दिले नाही असे महिलेने म्हटले आहे. 


हैदराबादमध्ये राहणाऱ्या 29 वर्षीय महिला हुमा सायरा यांनी हा आरोप लावला आहे. तिने सांगितले, की मे 2017 मध्ये तिचा निकाह झाला होता. ज्याच्याशी निकाह झाला तो वयात दुपटीपेक्षा जास्त होता. पीडित महिलेचे वय 29 वर्षे आहे. तर घटस्फोट देणाऱ्या पतीचे वय तब्बल 62 वर्षे आहे. तो भारतात नव्हे, तर ओमानमध्ये राहणारा तेथील नागरिक होता. दोघांचा निकाह हैदराबादेतच झाला. परंतु, विवाहानंतर ती आपल्या पतीसोबत ओमानला गेली होता. भारतात आली असताना पतीने तिला व्हॉट्सअॅपवर तलाक दिला आहे. त्यामुळे, तिने न्याय मिळविण्यासाठी आता परराष्ट्र मंत्रालयाची मदत घेतली आहे. 

बातम्या आणखी आहेत...