आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मौजमजेसाठी पाकीटमारी करणारा हैदराबादी चोर अंबाजोगाईत जेरबंद 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई - चोरी करून मिळालेल्या पैशात मित्रांना जेवण व दारू पाजून मौजमजा करणाऱ्या हैदराबाद येथील चोरास अंबाजोगाई येथील पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पकडले आहे. सचिन प्रकाश उपाध्याय (१९) असे पोलिसांनी पकडलेल्या चोराचे नाव अाहे. हैदराबाद येथून रेल्वेने परळीला येऊन त्यानंतर अंबाजोगाई बसस्थानकात प्रवाशांचे पाकीट मारणे, महिलांचे दागिने लांबवणे अशा चोऱ्या या सराईताने अंबाजोगाई बसस्थानकात तीन वेळा केल्या आहेत. अंबाजोगाई न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे . 
अमरावतीचे व्यापारी अमित गोपाल पारिख हे ११ जानेवारीला अंबाजोगाईत नातेवाइकाला भेटून अंबाजोगाई-परळी बसमध्ये चढत असताना त्यांच्या खिशातील दहा हजार रुपये चोराने लांबवले होते. 


शहर पोलिसांनी बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक संशयित प्रवाशांच्या मागे फिरताना दिसून आला. लागलीच पोलिस तेजस वाहुळे यांनी त्याला पकडून पोलिस ठाण्यात आणले. आपण हैदराबादहून चोरी करण्यासाठी परळीमार्गे अंबाजोगाईला येत असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. पोलिसांच्या चौकशीत सचिन प्रकाश उपाध्याय (वय १९)असे त्याचे नाव निष्पन्न झाले असून अंबाजोगाई येथील बसस्थानकात चोरी करण्यासाठी तो हैदराबादहून परळीत रेल्वेने यायचा. त्यानंतर तो परळीहून अंबाजोगाईला येत असे. अंबाजोगाईत आल्यानंतर दिवसभर बसस्थानकात टेहळणी करून प्रवाशांचे पाकीट व खिशातील पैसे चोरी करायचा. त्यानंतर हैदराबादकडे रवाना व्हायचा. 


सचिन प्रकाश उपाध्याय अंबाजोगाईत तीन चोऱ्या 
सचिन उपाध्याय हा मूळ हैदराबाद येथील रहिवासी असून तो निरक्षर आहे. त्याचे आजोळ नांदेड जिल्ह्यातील मुखेड असून अंबाजोगाईत चोरी करण्यासाठी तो खास हैदराबादहून रेल्वेने परळी आणि नंतर अंबाजोगाईच्या बसस्थानकात यायचा. चोरी करून सायंकाळी तो परळीहून पुन्हा रेल्वेने हैदराबादला जायचा. अंबाजोगाईत त्याने आतापर्यंत तीन वेळा चोऱ्या केल्या आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...