आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जानेवारीपासून हुंदाईच्या सर्व कारच्या किमती वाढणार, खर्च वाढल्याने घेतला निर्णय - कंपनी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हुंदाई मोटर इंडिया जानेवारीपासून आपल्या सर्व कारच्या किमती वाढवणार आहे. कंपनीने मंगळवारी सांगितले की, खर्च वाढल्याने हा निर्णय घेतला आहे. मात्र या किमती किती वाढणार हे अद्याप सांगितले नाही. वेगवेगळे मॉडल आणि फ्यूल टाइप नुसार वेगवेगळी वाढ होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. याबाबतची अधिकची माहिती नंतर देण्यात येणार आहे. 

हीरो मोटोकॉर्पच्या गाड्या जानेवारी पासून 2000 रुपयांनी महागणार 


हुंदाईपूर्वी मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्सने देखील जानेवारीसपासून वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. दुचाकी कंपनी हीरोमोटोकॉर्पने सांगितले की, एक जानेवारीपासून मोटरसायकल आणि स्कूटर्सची किंमत 2 हजार रुपयांनी वाढवणार आहे. 
 

दुचाकींच्या विक्रीत 15% घसरण

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स (एसआयएएम)ने मंगळवारी नोव्हेंबरमधील ऑटो सेल्सची आकडेवारी जारी केली. या आकडेवारीनुसार कारच्या विक्रीत 10.83% टक्के घट झालेी आहे. गेल्या महिन्यात 1 लाख 60 हजार 306 कारची विक्री झाली आहे तर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 1 लाख 79 हजार 783 युनिटची विक्री झाली होती. मोटरसायकलच्या विक्रीत देखील 14.87% टक्के घसरण झाली आहे. गेल्या महिन्यात 8 लाख 93 हजार 538 दुचाकींची विक्री झाली. तर नोव्हेंबर 2018 मध्ये हाच आकडा 10 लाख 49 हजार 651 युनिटचा होता.  

 

बातम्या आणखी आहेत...