आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सँट्रो कारच्या लाँचिंगपूर्वीच लिक झाली माहिती, किंमत 3.5 ते 5 लाखांदरम्यान, Wagon R आणि Alto k10 ला देणार टक्कर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - Hyundia ची नवी सँट्रो कार लाँचिंगआधीच चर्चेत आहे. लोकांना या कारची अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा होती. पण आता ही प्रतीक्षा संपणार आहे. ही कार मंगळवारी म्हणजे 23 ऑक्टोबरला लाँच होत आहे. पण त्याआधीच कारच्या टेस्ट ड्रायव्हींगचा व्हिडिओ लीक झाला आहे. यूट्यूब चॅनल फ्री व्हाइसकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. त्यात सँट्रो कारचे इंटेरियर, सेफ्टी फिचर आणि लूक्ससह संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. पण नंतर हा व्हिडिओ काढून टाकण्यात आला.  


लाँचिंगपूर्वीच 15 हजार बुकिंग
सँट्रोची ऑनलाइन प्रिबुकींग 10 ऑक्टोबरपासून सुरू झाली होती. 11 हजारांच्या अॅडव्हान्स पेमेंटवर ती बूक करता येत आहे. आतापर्यंत 15 हजारांहून अधिक बुकींग झाली आहे. नवी सँट्रो सेफ्टी फिचर, रिफ्रेश लूक आणि किमतीच्या बाबतीत Maruti च्या Alto K10, Wagon R, Ranault kwid, Tata Tiago आणि Datusn Go अशा कारना टक्कर देईल. 

 
पुढे वाचा, सेफ्टी फिचर बाबत.. 

 

बातम्या आणखी आहेत...