आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअॅटो डेस्क - ह्युंडई त्यांची नवी सँट्रो काल लवकरच इंडियन मार्केटमध्ये लाँच करणार आहे. रिपोर्ट्सनुसार कंपनी दिवाळीपर्यंत ही कार लाँच करणार आहे. टेस्टींगदरम्यान ही कार अनेकदा दिसली आहे. तर कंपनीही या कारशी संबंधित डिटेल्स हळू हळू इनव्हेल करत आहे. कंपनीने नुकतेच एक स्केच जारी केले होते. पण लाँचिंगबाबत अद्याप काहीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
4 लाख असू शकते किंमत
मीडिया रिपोर्ट्सनुसार या नव्या सँट्रोची किंमत 4 लाखांच्या आसपास असू शकते. म्हणजे या कारच्या एंट्री लेव्हर व्हेरीएंटची किंमत 4 लाख असेल. कारमध्ये 1.1 लीटरचे 3 सिलिंडर पेट्रोल इंजिन असेल. ते 5 मॅन्युअल स्पीड गीअरबॉक्ससह येईल. यात अॅटोमॅटिक ट्रान्समिशन मिळेल की नाही याबाबत डिटेल्स आलेल्या नाहीत.
लहान पण हायटेक
इंडियन मार्केटमध्ये ही कार सँट्रो किंवा AH2 नावाने लाँच केली जाऊ शकते. न्यू जनरेशन सँट्रोमध्ये टॉल-ब्वॉय स्टान्सही कायम असेल. जुन्या मॉडेलच्या तुलनेत याकारमध्ये अधिक स्पेस असेल. यात नवीन टचस्क्रीन आणि क्लायमेट कंट्रोल सिस्टीमही असेल. टेस्टींगदरम्यान दिल्लीच्या रस्त्यांवर ही कार अनेकदा दिसली आहे. पण ती पूर्णपणे झाकलेली असते.
यांच्याशी आहे स्पर्धा
इंडियन मार्केटमध्ये न्यू सँट्रोची स्पर्धा मारुती सुझुकी वॅगन आर, सिलेरियो, अल्टो, टाटा टियागो यांच्याशी असेल. या सर्व कार 4 लाखांच्या सेगमेंटच्या आसपास आहेत. सिलेरियोचे बेस मॉडल LXi ट्रिमची किंमत 4.15 लाख (एक्स शोरूम दिल्ली) आहे. तर वॅगनआरची किंमत 4.2 लाखांच्या जवळपास आहे.
1998 मध्ये झाली होती लाँच
1998 मध्ये सँट्रो ही भारतात लाँच झालेली ह्युंडईची पहिली कार होती. तसेच ही कार सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. मारुती 800 ला सँट्रोने थेट टक्कर दिली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.