आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काऊंटडाऊन सुरू : 10 ऑक्टोबरपासून सुरू होईल Hyundai च्या या कारचे बुकींग, किंमत 3.5 लाखांच्या आसपास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅटो डेस्क -  ह्युंडई त्यांची सर्वात जास्त प्रसिद्ध हॅचबॅक कार सँट्रो 23 ऑक्टोबरला लाँच करत आहे. या कारचे प्री बुकींग 10 ऑक्टोबरपासून सुरू होईल. नव्या मॉडेलसह या कारमध्ये अनेक हायटेक फिचर्स असतील असे समजले जात आहे. या कारचे नाव AH2 असू शकते. लाँचिंग डेट जवळ येत असल्याने या कारचे एक एक फिचर्सही समोर येत आहेत. सँट्रो ही 1998 मध्ये भारतात लाँच होणारी ह्युंडईची पहिली कार होती. सर्वाधिक विक्री झालेल्या कारच्या यादीतही या कारचा समावेश आहे.  मारुती 800 ला दिली होती थेट टक्कर. 


असे फिचर्स असू शकतात 
न्यू सँट्रोमध्ये जास्त स्पेस असलेले केबीन असेल. तसचे 7.0 इंच टचस्क्रीनचे इन्फोटेनमेंट सिस्टीम असू शकते. ते अँड्रॉइड अॅटो किंवा अॅपल कारप्लेला सपोर्ट करेल. त्याचबरोबर यात क्लायमेट कंट्रोल सिस्टीमही असेल. कंपनी यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्स आणि ABS स्टँडर्डही देऊ शकते. तर रिअर पार्किंग सेंसरही मिळले. टॉप व्हेरीएंट्समध्ये पार्किंग कॅमेराही असेल. 


3.5 लाख असू शकते किंमत 
मीडिया रिपोर्ट्सनुसार सँट्रोच्या नव्या मॉडेलच्या एंट्री लेव्हल व्हेरीएंटची किंमत 3.5 लाखांच्या आसपास असू शकते. तर टॉप व्हेरीएंट 5 लाखाच्या आसपास असेल. कारमध्ये 1.1 लीटरचे 3 सिलिंडर पेट्रोल इंजीन मिळेल. ते 5 मॅन्युअल स्पीड गीअरबॉक्ससह येईल. यात अॅटोमॅटिक ट्रान्समिशन मिळेल की नाही याबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. 


यांच्याशी असू शकते स्पर्धा 
इंडियन मार्केटमद्ये न्यू सँट्रोची स्पर्धा मारुती सुझुकीची वॅगनआर, सिलेरियो, अल्टो, अल्टो K10, टाटा टियागो यांच्याशी असेल. या सर्व कार 4 लाखांच्या आसपास आहेत. 

बातम्या आणखी आहेत...